India at Paris Olympic 2024 Live : पदक थोडक्यात गेलं, पण पोरगी खचली नाही! मनु भाकरचं मन जिंकणारं विधान

Manu Bhaker Paris Olympic 2024 : नेमबाज मनू भाकरला ऑलिम्पिक स्पर्धेतील तिसऱ्या पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली... शूट ऑफमध्ये तिची हार झाली...
Manu Bhaker Medal Olympic
Manu Bhaker Medal Olympic esakal
Updated on

Shooting Manu Bhaker Paris Olympic 2024 : नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा गाजवली. तिने तिसरे पदक जिंकले असते तर आणखी आनंद झाला असता... हेच पदक हुकल्याची सल मनात कायम राहील... मनु आणि हंगरीची मेजॉर व्हेरॉनिका यांच्यात २८-२८ अशा समान गुणामुळे शूट ऑफ लढत झाली आणि त्यात मनु थोडक्यात चुकली... पण, हा निकाल अंतिम नाही, यापुढे आणखी पदकं जिंकायची आहेत, असा निर्धार मनुने मॅचनंतर व्यक्त केला.

मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं तिने नावावर करून इतिहास घडवला. इतिहासात भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. १९०० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारी मनु ही पहिलीच भारतीय ठरली आहे.

मनु भाकरने तीन सीरिजमध्ये १० गुण घेताना दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण चौथ्या सीरिजनंतर मनुची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि ती व्हिएतनामच्या खेळाडूसह १३ गुणांसह बरोबरीत राहिली. पाचव्या सीरिजमध्ये मनुने पाच अचूक लक्ष्य भेदून जबरदस्त पुनरागमन केले आणि १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. हंगरिची मेजॉर १९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.

सहाव्या सीरिजमध्ये मनुने पाचपैकी चार शॉट्स अचूक साधले आणि २२ गुणांसह ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. पण, तिला अन्य नेमबाजांकडून टक्कर मिळत होती आणि एक चूक कोणालाही महागात पडणारी ठरली असती. फ्रान्सच्या कॅमिल व मेजॉर हे मनुला टक्कर देत होते आणि सातव्या सीरिजमध्ये मनुने पुन्हा एकदा पाचपैकी चार शॉट्स अचूक मारून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली होती. पण, फ्रान्सची कॅमिल २६ गुणांसह मनुसह बरोबरीत होती. कोरियाची यांग जिन २७ गुणांसह अव्वल स्थानी होती.

८व्या सीरिजमध्ये मनुचे दोन शॉट्स चुकले आणि ती २८ गुणांसह तिसऱ्या स्थानी गेली. यावेळी मेजॉर ( २८) हिच्यासह शूट ऑफ झाला. त्यात मनु हरली आणि तिला चौथ्या स्थानावर समाधानी रहावे लागले. शूट ऑफमध्ये मनुचे दोन शॉट्स चुकले आणि मेजॉर वरचढ ठरली. मेजॉरने कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या यांग जिनने सुवर्ण व फ्रान्सच्या कॅमिलीने रौप्यपदक जिंकले. या मॅचनंतर मनु म्हणाली, दोन पदकं जिंकल्याचा आनंद आहे, परंतु आता मी थोडी निराश आहे. चौथं स्थान हे काही चांगलं नाही. आपल्या आयुष्यात नेहमी Next Time असते आणि मी त्यासाठी सज्ज आहे. मी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार....

मनु भाकरची कामगिरी...

मनुने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात एक सुवर्ण ( २०२३) व एक कांस्य ( २०२२ ) पदक जिंकले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या नावावर ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदकं तिने जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण, ज्युनियार जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड कप, जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धा, युवा ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा अशा विविध स्पर्धा मनुने गाजवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.