Medal Tally Olympic 2024 : एकटी मनु भाकर किती प्रयत्न करणार? पदक तालिकेत भारतीय संघ बघा कुठेय

Paris Olympic 2024 Medal Tally - ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने वर्चस्व कायम राखलेले पाहायला मिळतेय.. चीन १३ सुवर्ण, ९ रौप्य व ९ कांस्य अशी एकूण ३१ पदकं जिंकून पहिल्या स्थानावर पाय मजबूत रोवून उभे आहेत.
Manu Bhaker Medal tally Olympic
Manu Bhaker Medal tally Olympicesakal
Updated on

Medal Table of Paris Olympic 2024 Live : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आतापर्यंत नेमबाज मनु भाकर हिने दोन पदकं जिंकून दिली आहेत आणि महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनेही कांस्यपदक जिंकले. पी व्ही सिंधू, सात्विक-चिराग या पदकाच्या प्रबळ दावेदार भारतीय खेळाडूंना थोडक्यात अपयश आले. तिरंदाजीतही धीरज व अंकिता यांना कांस्यपदकाच्या लढतीत निसटता पराभव पत्करावा लागला. पण, भारत पदकतालिकेत अजूनही खूप मागे आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत चीनने वर्चस्व कायम राखलेले पाहायला मिळतेय.. चीन १३ सुवर्ण, ९ रौप्य व ९ कांस्य अशी एकूण ३१ पदकं जिंकून पहिल्या स्थानावर पाय मजबूत रोवून उभे आहेत. सुरुवातीला अव्वल स्थानी असलेला जपान सहाव्या क्रमांकावर सरकला आहे. जपानकडे ८ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्यपदकं आहेत. यजमान फ्रान्स ( ११ सुवर्ण, १२ रौप्य व १३ कांस्य) ३६ पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर राहून चीनला टक्कर देत आहे.

Manu Bhaker Medal tally Olympic
India at Paris Olympic 2024 Live : टोकियोची पुनरावृत्ती! टीम इंडियाच्या पदकाच्या मार्गात 'तोच' जुना प्रतिस्पर्धी

ऑस्ट्रेलिया ११ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्य अशा एकूण २२ पदकांसह तिसऱ्या, अमेरिका ९ सुवर्ण, १८ रौप्य व १६ कांस्य अशा एकूण ४३ पदकांसह चौथ्या आणि ग्रेट ब्रिटन ९ सुवर्ण, १० रौप्य व ८ कांस्य अशा एकूण २७ पदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोरिया ( १६ पदकं), इटली ( १७ ), नेदरलँड्स ( ९) व कॅनडा ( ११) असे देश अव्वल दहामध्ये आहेत.

भारत कुठे?

नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अविस्मरणीय केले आहे. १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक ( सरबजोत सिंगसह ) अशी दोन कांस्यपदकं तिने नावावर करून इतिहास घडवला. इतिहासात भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली.

महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे यानेही ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. १९५२ साली खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक पदक जिंकणारे महाराष्ट्राचे पहिले खेळाडू ठरले होते. त्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने हा मान राज्याला मिळवून दिला. भारत ३ कांस्यपदकांसह तालिकेत ४७व्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.