Paris Olympic 2024: एकटा वाघ जगाला भारी! ऑलिंपिकच्या इतिहासात भारताने जितके गोल्ड मेडल जिंकलेत त्याच्या डबल 'या' पठ्ठ्याकडे

Olympic 2024 : फ्रान्सचे पॅरिस शहर ऑलिम्पिक 2024 साठी जगभरातील लोकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. 26 जुलै रोजी या क्रीडा महोत्सवाची रंगतदार सुरुवात होईल, त्यानंतर 206 सदस्य देशांतील हजारो खेळाडू 32 खेळांमध्ये 329 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा करतील.
paris olympic 2024 michael phelps
paris olympic 2024 michael phelpssakal
Updated on

Paris Olympic 2024: फ्रान्सचे पॅरिस शहर ऑलिम्पिक 2024 साठी जगभरातील लोकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. 26 जुलै रोजी या क्रीडा महोत्सवाची रंगतदार सुरुवात होईल, त्यानंतर 206 सदस्य देशांतील हजारो खेळाडू 32 खेळांमध्ये 329 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा करतील. खेळांचा हा महाकुंभ 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारतातून 117 खेळाडूंचा संघही सहभागी होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न पदक जिंकण्याचे असते. पण सर्वच खेळाडू हे स्वप्न साकार करू शकत नाहीत. यावेळीही ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्रा, कुस्ती, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, बॅडमिंटन आणि तिरंदाजीमध्येही भारतीय खेळाडूकडून देशाला सुवर्णपदकाची आशा आहे.

paris olympic 2024 michael phelps
Paris Olympic 2024: ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची अंतिम यादी जाहीर

पण ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताची एकूण कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारताने 1900 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता, तेव्हापासून देशाने फक्त 10 सुवर्णांसह केवळ 35 पदके जिंकली आहेत. ज्यात फक्त पुरुष हॉकीमध्ये 8 सुवर्णपदकांचा समावेश आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. अमेरिकेने आतापर्यंत एकूण 3105 पदके जिंकली असून त्यात 1229 सुवर्णांचा समावेश आहे. एकट्या अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये 23 सुवर्ण, 3 रौप्य आणि दोन कांस्यांसह 28 पदके जिंकली आहेत.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एकट्या फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या 10 सुवर्णपदकांपेक्षा दुप्पट पदके जिंकली आहे, आतापर्यंत ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात कोणताही खेळाडू फेल्प्सच्या पदकांच्या जवळपासही नाही.

paris olympic 2024 michael phelps
Paris Olympic 2024 : बाबा, मी Gold जिंकलं! वडिलांचा त्याग अन् स्वप्नासाठी झटणाऱ्या लेकाची हृदयस्पर्शी गोष्ट

2000 मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या फेल्प्सने 5 ऑलिम्पिक खेळले. तो सिडनी ऑलिम्पिक 2000, अथेन्स ऑलिम्पिक 2004, बीजिंग ऑलिम्पिक 2008, लंडन ऑलिंपिक 2012 आणि रिओ ऑलिंपिक 2016 चा भाग होता. रिओ ऑलिम्पिकनंतर त्याने निवृत्ती घेतली.

पहिल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये तो एकही पदक जिंकू शकला नाही, परंतु त्यानंतरच्या 4 ऑलिम्पिकमध्ये त्याने 23 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य अशी एकूण 28 पदके जिंकली. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण जिंकण्याचा विक्रमही फेल्प्सच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर रशियाची लारिसा लेटिनिया आहे, तिच्या नावावर एकूण 18 पदके आहेत ज्यात 9 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.