Paris Olympic 2024 Neeraj Chopra : नीरज चोप्राचे टेंशन वाढवणारी बातमी आली; जर्मन खेळाडूनं चिंतेत भर टाकली

India at Paris Olympic 2024 : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. थोड्याच वेळात पात्रता फेरी रंगणार आहे आणि त्यापूर्वीच नीरजचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
julianweber
julianweberesakal
Updated on

Paris Olympic 2024 Neeraj Chopra Live : भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत तीन कांस्यपदक जिंकता आली आहेत. लक्ष्य सेन, सात्विक-चिराग यांच्यासह भारताची पाच पदकं थोडक्यात हुकल्याची खंत चाहत्यांमध्ये आहे. आता सर्वांच्या अपेक्षा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यावर आहेत आणि आज पात्रता फेरीसाठी तो मैदानावर उतरणार आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता आणि त्याच्या पुनरावृत्तीची त्याच्याकडून अपेक्षा आहे. पण, पॅरिसमध्ये पात्रता फेरीपूर्वीच नीरजच्या चिंतेत भर पडणारे वृत्त समोर आले आहे.

नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतत ८७.५८ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले होते. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय. पण, आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला पराक्रम नीरजला पॅरिसमध्ये खुणावतोय. त्याला पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे.

julianweber
Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आज उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?

नीरजसमोर आव्हान...

नीरजने यंदा ९० मीटरचे लक्ष्य ठेवले असले तरी त्याच्यासमोर जर्मनीचा ज्युलियन वेबर व मॅक्स डेहनिंग, पाकिस्तानचा अर्शद नदीम, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचे आव्हान आहे. या सर्वांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ही ९० मीटरच्या वर आहे. त्यामुळे नीरजला यंदा कडवे आव्हान असेल हे नक्की आहे.

दरम्यान, भालाफेकीच्या फायनलासाठी खेळाडूंना ८४ मीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. अ गटात वेबरने ८७.७६ मीटर भाला फेकून पहिल्या प्रयत्नात अंतिम फेरी निश्चित केली आहे. त्याच्यासोबत केनियाचा ज्युलिअस येगो ( ८५.९७ मी.), झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेच ( ८५.६४ मी.) व फिनलँडच्या टोनी केरानेन ( ८५.२७ मी.) यांनी आतापर्यंत फायनलमधील स्थान पक्के केले आहे. भारताचा किशोर जेना तीन प्रयत्नांत ८०.७३मीटर एवढेच अंतर पार करू शकला आहे.

नीरजचं टेंशन का वाढलं?

नीरजने ८७.५८ मीटर भालाफेक करून टोकियोत सुवर्णपदक जिंकले होते, परंतु आज वेबरने पात्रता फेरीत ८७.७६ मीटर लांब भाला फेकला आहे. त्यामुळी नीरजची कसोटी लागेल हे निश्चित आहे. पण, नीरजची सर्वोत्तम कामगिरी ही ८९.९४ मीटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.