NIsha Dahiya Injury : काही करून निशाला जखमी कर, कोपऱ्यातून सूचना आल्या अन्...! भारतीय प्रशिक्षकाचा खळबळजनक दावा

Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during match : भारताची महिला कुस्तीपटू निशा दहिया हिचे पॅरिस ऑलिंपिकमधील आव्हान सोमवारी संपुष्टात आले.
Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during match
Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during matchsakal
Updated on

NIsha Dahiya Injury Paris Olympic 2024 : भारताची महिला कुस्तीपटू निशा दहिया हिचे पॅरिस ऑलिंपिकमधील आव्हान सोमवारी संपुष्टात आले. हाताला झालेल्या दुखापतीनंतरही निशा महिलांच्या ६८ किलो वजनी गटात (फ्रीस्टाईल) दक्षिण कोरियाच्या पाक सोल गम हिच्याविरुद्ध लढली. दुखापतीआधी ८-२ अशी आघाडी असलेल्या निशा हिला अखेरीस १०-८ असे पराभूत व्हावे लागले.

Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during match
Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आज उतरणार मैदानात, जाणून घ्या कधी अन् किती वाजता सुरू होणार सामना?

पहिल्या पीरियडमध्ये निशा दहिया हिने तांत्रिक खेळामध्ये बाजी मारली. तिने चार गुण पटकावत आघाडी मिळवली. पण दुसऱ्या पीरियडमध्ये निशाला दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन मिनिटे बाकी असताना ८-२ अशी आघाडी मिळवणाऱ्या निशाला १०-८ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during match
Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्‍ड मेडल' जिंकणाऱ्या खेळाडूला आली गार्डनमध्ये झोपण्याची वेळ, काय घडलं नेमकं ?

पराभवानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या निशाच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. मात्र दुखापत असतानाही तिने मॅटवर दिलेली झुंज वाखाणण्याजोगी होती. निशाच्या दुखापतीवर भारतीय प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांनी मोठे आरोप केले आहेत.

Paris Olympic 2024 Nisha Dahiya injured during match
बांगलादेशातील हिंसाचाराचा क्रिकेट विश्वाला फटका! जाळपोळ, हल्ल्यामुळे ICC टेन्शनमध्ये; T20 World Cupचं यजमानपद गमवणार?

भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांनी पीटीआयला सांगितले की, “हे १००टक्के जाणूनबुजून होते, तिने निशाला जाणीवपूर्वक दुखावले. आम्ही पाहिले की कोरियन कोपऱ्यातून एक सूचना आली ज्यानंतर तिने मनगटाच्या सांध्यावर मारल. तिने निशाकडून पदक हिसकावून घेतले.

प्रशिक्षक पुढे म्हणाले की, “निशाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, तिच्या गळ्यात पदक होते आणि ते हिसकावले गेले आहे. निशा बचाव आणि प्रतिआक्रमण दोन्हीमध्ये उत्कृष्ट होती, तिने आशियाई पात्रता स्पर्धेत याच कुस्तीपटूचा पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.