Paris olympics 2024 Live : पदकाचे खाते उघडले! नेमबाजीत अचूक 'लक्ष्य' भेदले

Paris Olympic 2024- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शनिवारी भारताला रोईंग आणि १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात थोडक्यात अपयशाला सामोरे जावे लागले.
Kazakhstan win bronze
Kazakhstan win bronzesakal
Updated on

India at Paris olympics 2024 Live Update -भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजी संघाने २५ जुलै रोजी झालेल्या पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. पण, शनिवारी रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवारची ( Balraj Panwar) थेट पात्रतेची संधी थोडक्यात हुकली, तर रमिता आणि अर्जुन बबुता यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात पदकाच्या शर्यतीतून १ गुणाच्या फरकाने बाहेर पडावे लागले. पण, याच गटातून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिला पदक विजेता संघ मिळाला आहे.

१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात चौथ्या क्रमांकावरील जर्मनीला ( ६२९.७) कांस्यपदकाच्या लढतीतत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कझाकस्तान ( ६३०.८) सामना करावा लागला. चीनच्या हूआंग युतिंग आणि शेंग लिहाई हे ६३२.२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि दक्षिण कोरियाच्या केयूम जिहॉन व पार्क हाजून यांना ६३१.४ गुणांसह दुसरे स्थान मिळाले. चीन व कोरिया यांच्यात सुवर्णपदकाची लढत होणार आहे.

कांस्यपदकाच्या लढतीत कझाकस्तानच्या ले अॅलेक्झांड्रा व सॅतपायेव्ह इस्लाम यांनी जर्मनीच्या उलब्रिच मॅक्सिमिलयन व यान्सेन आना यांना कडवी टक्कर दिली. तिसऱ्या शॉट्सपर्यंत दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी होती, परंतु कझाकच्या नेमबाजांनी सलग सहा शॉट्समध्ये प्रत्येकी २ गुण मिळवताना १७-५ अशी भक्कम आघाडी घेऊन कांस्यपदक नावावर केले.

Kazakhstan win bronze
Kazakhstan win bronzesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.