Paris Olympic Uniform: 'पुरे..! ऑलिंपिक गणवेशापेक्षा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष द्या'; अखेर ड्रेस डिझायनरने सोडलं मौन

Tarun has tried to convince netizens by defending his side: 'काही उद्योग क्षेत्रात या डिझाईनला पसंदी सुद्धा दर्शवलेली असून चांगल्या प्रतिक्रियाही मला मिळाल्या आहेत', असेही तरुण ताहिलियानी म्हणाले.
fashion designer Tarun tahiliyani
fashion designer Tarun tahiliyanisakal
Updated on

Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिंपिक २०२४ साठी भारतीय संघासाठी असणारा गणवेश हा फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाईन केला होता, परंतु सोशल मिडीयावर त्यांच्या या डिझाईनवरून सर्वत्रच वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता अशामध्येच तरूण यांनी आपल्या बाजूचा बचाव करत नेटकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, 'पोशाखावरून वाद करण्यापेक्षा आपल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष द्या'. तसेच काही उद्योग क्षेत्रात या डिझाईनला पसंदी सुद्धा दर्शवलेली असून चांगल्या प्रतिक्रियाही मला मिळाल्या आहेत असेही ते म्हणाले.

कोण आहेत तरुण ताहिलियानी ?

तरुण ताहिलियानी हे एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. आधूनिक पोशाखांमध्ये पारंपारिक संस्कृतीची झलक देणे ही त्यांची मुख्य शैली आहे. त्यांची कामाबद्दलची उच्च गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन डिजाईनमध्ये पुरेपूर दिसून येते.

आता ऑलिंपिकमध्ये त्यांनी केलेल्या डिझाईनवरून उमटलेल्या प्रतिक्रियांना त्यांनी न जुमानता उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांसाठी साडी नसून अन्य वेगळा पोशाख डिझाईन केला होता ज्यामध्ये भारतीय ध्वजाचे प्रतिबिंब करणारा सुंदर देखावा दाखवण्याचा त्यांचा हेतू होता परंतू शेवटच्या क्षणी त्यांना साडीचा निर्णय घ्यावा लागला. मतंमतांतरे वेगळी असली तरी मी डिझाईनमागील प्रतिकात्मक आणि त्याचा हेतू यावर विश्वास ठेऊन मी या गणवेशाला समर्थन देत आहे असे त्यांनी सांगितले.

fashion designer Tarun tahiliyani
Paris Olympic 2024 Medal Tally- जपान अन् चीन यांच्यातील शर्यतीत फ्रान्सची एन्ट्री; भारत कितव्या स्थानी?

गणवेशापेक्षा जास्त आता आपले लक्ष खेळाडूंच्या कामगिरीवर असले पाहिजे असे त्यांनी अधोरेखीत केले. ऑलिंपिकच्या पोशाखावरून सोशल मिडीयावर तरूण यांच्यावर टिका करण्यात आली होती. काहींनी त्यांना 'डोळ्यात खुपणारी गोष्ट' तर 'हलक्यातील हलकं काम' असे देखील म्हणले आहे.

माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपली नाराजी दर्शवली. महिलांसाठी असणाऱ्या साडी या गणवेशावर तसेच त्यासाठी वापरण्यात आलेल्या कपड्यावर देखील त्यांनी टिका केली आहे. "सर्वच महिलांना साडी नेसता येत नसू शकते. जर तुम्ही त्याला निरीक्षण केले असते तर समजलं असते की साडीची अवस्था कशी आहे, ब्लाऊजसुद्धा फिटींगमध्ये व्यवस्थित दिसत नव्हते. फक्त तिरंग्याचा रंग भारतीय संस्कृतीची शान दर्शवत नाहीत".

कसा होता पोशाख ?

पुरूष - पुरूष खेळाडूंसाठी भारतीय तिरंग्याचा भगवा आणि हिरवा रंग असलेले जॅकेट, पांढरा कुर्ता व पायजमा.

महिला- महिला खेळाडूंसाठी असलेल्या साडीवर भगवा आणि हिरवा रंगाची काठ.

या प्रतिक्रीयांना उत्तर देत तस्वा आणि आदित्य बिर्ला यांनी सांगितले, "ताहिलियानी एक मुख्य डिझायनर आहेत. आमचे उद्दिष्ठ हे केवळ हटके लूक नव्हता तर खेळाडूंसाठी कार्यशील आणि आरामदायी गणवेश तयार करणे हा होता. आम्ही तरुण ताहिलियानी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एकच सांगत आहोत की, आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला समर्थन करा."

तस्वाने सन्मानाने आणि अभिमानाने भारताचे प्रतिनिधीत्व करण्याच्या वचनबद्धतेवर अधिक जोर दिला आहे. आमचा विश्वास आहे की तिरंग्याची रचना आपल्या अभिमानाचे प्रतिक आहे आणि हा अभिमान सीन नदीवर दिसला आहे.

fashion designer Tarun tahiliyani
Manika Batra : मनिकाने रचला इतिहास! गेल्या १६ ऑलिम्पिकमध्ये जे घडलं नाही ते घडलं, चीनी साम्राज्य मोडून काढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.