Paris Olympic 2024 : सीन नदीतील प्रदूषणामुळे ट्रायथलॉन जलतरण सराव रद्द

latest news of paris olympic 2024 |ऑलिंपिकमधील ट्रायथलॉन स्पर्धेतील जलतरणाचे केंद्र असलेल्या सीन नदीतील प्रदूषित पाण्यामुळे रविवारी जलतरणपटूंचे सराव सत्र रद्द करण्याची नामुष्की स्पर्धा आयोजकांवर ओढवली.
paris olympic 2024 triathlon training session in Seine river cancelled  due to water quality
paris olympic 2024 triathlon training session in Seine river cancelledSakal
Updated on

पॅरिस : ऑलिंपिकमधील ट्रायथलॉन स्पर्धेतील जलतरणाचे केंद्र असलेल्या सीन नदीतील प्रदूषित पाण्यामुळे रविवारी जलतरणपटूंचे सराव सत्र रद्द करण्याची नामुष्की स्पर्धा आयोजकांवर ओढवली.

यासंबंधात पॅरिस २०२४ आणि वर्ल्ड ट्रायथलॉन यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. त्यानुसार, चाचण्यांत नदीच्या पाण्याची गुणवत्ता स्वीकार्य मानकापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रायथलॉनमधील जलतरण सराव टप्पा सकाळच्या सत्रात नियोजित होता, तर बाईक व धावण्याचे सराव सत्र नियोजनानुसार ठरले.

जुलैमध्ये सीन नदीतील पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर नदीतील पाणी पोहण्यासाठी स्वच्छ असल्याचे मानण्यात आले होते. मात्र, फ्रेंच राजधानीत गेल्या ४८ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची गुणवत्ता खालावल्याचे दिसून आले.

paris olympic 2024 triathlon training session in Seine river cancelled  due to water quality
Paris olympics 2024 Live Update - Sorry बायको! मी आपल्या लग्नाची अंगठी हरवली; बिचाऱ्या खेळाडूची 'सोशल' माफी

खेळाडूंच्या आरोग्यास प्राधान्यक्रम आहे, असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले. सीन नदीत (शनिवारी) चाचणी घेण्यात आल्यानंतर पाण्याच्या गुणवत्तेची पातळी स्पष्ट झाली. वर्ल्ड ट्रायथलॉन या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या दृष्टिकोनातून स्पर्धा प्रकार घेण्यास परवानगी देण्याबाबत पुरेशी हमी देण्यात आलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता

येत्या ४८ तासांतील हवामानाच्या अंदाजामुळे पॅरिस २०२४ व वर्ल्ड ट्रायथलॉन आशावादी असून ट्रायथलॉन स्पर्धा (३० जुलै रोजी) सुरू होण्यापूर्वी पाण्याचा दर्जा आवश्यक मानकाच्या खाली येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पाण्याचा दर्जा आवश्यक मानक गाठू शकला नाही, तर ट्रायथलॉन स्पर्धा काही दिवसांसाठी लांबणीवर पडू शकते किंवा पॅरिसच्या पूर्वेस वाहणाऱ्या मार्न नदीवरील व्हेयर-स्यूर-मार्न येथे घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.