कुस्तीपटू विनेश फोगाटनं अपात्रता प्रकरणावर केलेल्या अपिलावर CAS कडं सुनावणी पार पडली आहे. आज रात्री साडेनऊला यावर निकाल येणार होता. पण हा निकाल पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळं आता 13 ऑगस्ट रोजी या अपिलावरील निकाल जाहीर होणार आहे.
याआधी 11 ऑगस्टला निकाल येईल असं सांगण्यात येत होतं. पण आता आलेल्या नव्या अपडेट नुसार मंगळवारी म्हणजेच 13 ऑगस्टला हा निकाल जाहीर होईल.