Akhil Kumar : अमित पंघाल आता मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम

पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी संघातून वगळण्यात आल्याचा सहन केलेला धक्का त्यामुळे अमित पंघालची मानसिकता कणखर झाली आहे.
Amit Panghal
Amit Panghalsakal
Updated on

नवी दिल्ली - पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी संघातून वगळण्यात आल्याचा सहन केलेला धक्का त्यामुळे अमित पंघालची मानसिकता कणखर झाली आहे. या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय चमूतील तो मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला खेळाडू असेल, असे मत माजी राष्ट्रकुल विजेता बॉक्सर अखिल कुमारने व्यक्त केले आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत अमितला पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या एका तांत्रिक नियमामुळे अमितला संघातले स्थान गमवावे लागले होते.

या सर्व आव्हानांचा सामना केल्यानंतर अमितने उमेद गमावली नाही. पॅरिस ऑलिंपिकसाठी त्याने आपली पात्रता सिद्ध केली. परिणामी त्याची मानसिकता मजबूत झाली आहे, असे अखिल कुमारने सांगितले.

पिछेहाट होत असताना अमितने संधी मिळताच ती दोन्ही हाताने स्वीकारली आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी ५१ किलो गटात आपली पात्रता मिळवली. संघात आपल्याला स्थान नाही या नैराश्येमुळे त्याला रात्री झोप येत नसणार, मात्र दिवसभर त्याने आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी कठोर मेहनत केलेली असणार. हा प्रवास त्याला शब्दात सांगणे कठीण जाईल. त्याने स्वतःचे मनोबल स्वतःच वाढवलेले आहे, असेही अखिल कुमार म्हणाला.

ऑलिंपिकचा अपवाद वगळता अमितकडे सर्व मोठ्या स्पर्धांतील पदके आहेत. तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानीही राहिलेला आहे.

लोवलिनाकडूनही अपेक्षा

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या लोवलिनाकडून या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतही पदकाची आशा अखिलने व्यक्त केली. तिने यंदाही यश मिळवले, तर भारतीय बॉक्सिंगमध्ये दोन ऑलिंपिक पदके मिळवणारी ती पहिली बॉक्सर ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.