Paris Olympic 2024 : ऑलिंपिकला सुरुवात... पॅरिसवासीयांनी सोडलं शहर

latest news of paris olympic 2024 |पॅरिसमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीच स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
paris olympic games seine transport crowds resident away from games
paris olympic games seine transport crowds resident away from games Sakal
Updated on

पॅरिस ऑलिंपिकची सुरुवात अतिशय दिमाखदार सोहळ्याने झाली. प्रचंड उत्साहात जवळपास तीन लाख चाहते सीन नदीच्या तीरावरून खेळाडूंना प्रोत्साहित करत होते, जगभरातून क्रीडाप्रेमी या सोहळ्यासाठी आणि स्पर्धांसाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत; पण पॅरिसमध्ये राहणाऱ्या नागरिकांनीच स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

ऑलिंपिक स्पर्धांच्या काळात बहुसंख्य पॅरिसवासीयांनी शहर सोडून जाण्याचा पर्याय निवडलाय. ऑलिंपिकच्या काळात जवळपास १.५ कोटी पर्यटक पॅरिसमध्ये येतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे; पण पॅरिसमध्ये राहणारे नागरिकच पॅरिस सोडून जातील, याचा अंदाज प्रशासनाला नव्हता.

पर्यटकांची गर्दी

वर्षभरात जेवढे पर्यटक पॅरिसला भेट देतात, त्यापेक्षा जास्त पर्यटक केवळ ऑलिंपिकच्या दिवसांत पॅरिसमध्ये आले आहेत, त्यामुळे शहरात गर्दी होईल आणि फ्रेंच लोक तसेही फार सोशल नसतात, त्यामुळे एवढी गर्दी सहन करणं त्यांच्यासाठी थोडं जिकिरीचं होतं. त्यामुळे अनेकांनी पॅरिस सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलाय.

शहराचा मध्यवर्ती भाग बंद

स्पर्धेदरम्यान पॅरिस शहराच्या मध्यवर्ती भागात उद्घाटन समारंभापर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेला होता. स्पर्धांची अनेक ठिकाणं ही रहिवासी ठिकाणाच्या आजूबाजूला आहेत आणि अजूनही या ठिकाणांजवळ सगळ्यांना प्रवेश देण्यात येत नाहीये.

paris olympic games seine transport crowds resident away from games
Paris Olympic Boxing 2024 : निखत, प्रीतीचा दमदार पंच; बॉक्सिंगमध्ये महिलांनी ५४ किलो व ५० किलो वजनी गटात गाठली पुढील फेरी

या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेत तिथल्या रहिवाशांनाही क्यूआर कोड आणि पासेस देण्यात आलेय, त्यामुळं स्वत:च्या घरी जायलाही रहिवाशांना मोठी सुरक्षा व्यवस्था पार करावी लागते. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला कंटाळून अनेक जणांनी पॅरिस सोडण्याचा निर्णय घेतला.

वाहतुकीचे दर वाढले

पॅरिसमधील रहिवासी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. ऑलिंपिकच्या निमित्तानं सरकारने या सार्वजनिक वाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. १७ जुलैपासुन २.१ युरोचं तिकीट एकदम चार युरोवर गेलं. या निर्णयानंतर नागरिकांनी सरकारच्या विरोधात आंदोलनंही केली होती; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सरकारनं निर्णय मागे घेतला नाही.

ऑफिसेसना घरून काम करण्याची संधी

पॅरिसमध्ये स्पर्धांच्या दरम्यान पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने अनेक कंपन्या आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना केल्या होत्या, त्यानुसार अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली गेली, त्याचा फायदा घेत आणि गर्दीपासून दूर जात अनेक नागरिकांनी पॅरिसच्या बाहेरच जाण्याचा निर्णय घेतला.

paris olympic games seine transport crowds resident away from games
Paris Olympic 2024 : सीन नदीतील प्रदूषणामुळे ट्रायथलॉन जलतरण सराव रद्द

आरोग्याचा प्रश्न

अजून जग कोरोनाच्या धक्क्यातून सावरतंय, त्यातच प्रचंड गर्दीच्या असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमुळे पुन्हा आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याचा विचार करण्यात आलेला आहे.

व्यवसायाची संधी

पॅरिसमध्ये होणाऱ्या या ऑलिंपिक स्पर्धा अनेकांसाठी व्यवसायाची संधी ठरल्यात. अनेक रहिवाशांनी त्यांची घरं तात्पुरती एआरबीएनसारख्या प्लॅटफॉर्मसवर भाडेतत्त्वानं देऊन पैसे कमावण्याची संधी साधली.

अर्थात कारणं वेगवेगळी असली तरीही जगभरातील चाहत्यांमध्ये ज्या स्पर्धेचा दांडगा उत्साह दिसतोय, त्याच स्पर्धांकडे यजमान शहरातील नागरिकांनी मात्र पाठ फिरवली. पॅरिसमधल्या गर्दीत एवढी सुरक्षा व्यवस्था पार करून स्पर्धा बघण्यापेक्षा घरात मित्रांसोबत बसून टीव्हीवर सगळे खेळ बघू, असं अनेक पॅरिशियन्सनं ठरवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.