Javelin Throw Gold Winner Receives Buffalo as Gift Viral Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीच्या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकले. त्याने नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित करत हे सुवर्णपदक मिळवले होते. पाकिस्तानचे हे ऍथलेटिक्समधील पहिलेच सुवर्णपदक ठरले.
त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचे सध्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तो जेव्हा हे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये परतला होता, तेव्हा त्याचे जंगी स्वागतही झाले होते. त्याच्यावर अनेकांनी बक्षीसाचा वर्षाव केला. त्याचे सासरे मुहम्मद नवाझ यांनी त्याला म्हैस भेट दिली आहे. त्यांच्या गावात म्हैस भेट देणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.
दरम्यान, या भेटीबद्दल अर्शद नदीमने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात तो गमतीने म्हैसऐवजी ५-६ एकर जमीन द्यायला हवी असं म्हटलं होतं.