Paris Olympic Security : पॅरिस ऑलिंपिकला भारतीयांचे सुरक्षा कवच; केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व श्‍वान पथक तैनात

पॅरिस ऑलिंपिकचा भारतीयांचे सुरक्षा कवच असणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व विशेष कमांडो श्‍वान पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Security Shield of Indians for Paris Olympic
Security Shield of Indians for Paris Olympicsakal
Updated on

नवी दिल्ली - पॅरिस ऑलिंपिकचा भारतीयांचे सुरक्षा कवच असणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व विशेष कमांडो श्‍वान पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिंपिकचा दहशतवादी व हाणामारी करणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिंपिकच्या स्पर्धा, शर्यती जिथे होणार आहेत, तिथे पोलिस दलातील जवान व श्‍वान तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून याप्रसंगी देण्यात आली.

सुरक्षा अधिकाऱ्यांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, दहा श्‍वान पथकांचा संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज झाला आहे. पॅरिस ऑलिंपिक आयोजित करण्यात येत असलेल्या विविध ठिकाणी श्‍वान पथक आपले काम करणार आहे. त्याआधी या श्‍वान पथकाला दहा आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारत व फ्रान्स या दोन्ही देशांच्या सरकारकडून संयुक्तपणे सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे.

३० हजार पोलिसांची करडी नजर

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार ऑलिंपिकमध्ये प्रत्येक दिवशी ३० हजार पोलिसांची करडी नजर असेल. पॅरिस ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्याला तब्बल ४५ हजार पोलिस कार्यरत असणार आहेत. लष्करातील १८ हजार सदस्यही ऑलिंपिकसाठी सज्ज झाले आहेत.

पोलिसांची टीम सज्ज

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पोलिसांची टीम सज्ज झाली आहे. यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासह केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल, सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा गार्डमधील कमांडो व आसाम रायफल्स यांचा समावेश आहे.

बेल्जियन मालिनॉइस जातीचे श्‍वान

पॅरिस ऑलिंपिकच्या सुरक्षेसाठी बेल्जियन मालिनॉइस जातीचे श्‍वान तयार करण्यात आले आहेत. दहशतवादविरोधी कारवाया, तसेच देशातील विविध अंतर्गत सुरक्षेसाठी अशा श्‍वानांचा वापर करण्यात येतो. या पथकात पाच वर्षांचा वास्ट आणि तीन वर्षांचा डेन्बी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.