Covid Strikes Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाली 'कोरोना'ची एन्ट्री...! स्विमिंगमध्ये मेडल जिंकल्यानंतर खेळाडू पॉझिटिव्ह

Covid Strikes Paris Olympic News : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा थरार 26 जुलैपासून सुरू झाला आहे.
British swimming star Adam Peaty tests positive for COVID
British swimming star Adam Peaty tests positive for COVIDsakal
Updated on

Covid-19 In Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा थरार 26 जुलैपासून सुरू झाला आहे. पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळाचा आनंद चाहते घेत आहेत, मात्र यादरम्यान महाकुंभमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. इंग्लिश ऍथलीटला कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोरोनाची लागण झाली आहे. ॲडमने 28 जुलै रोजी 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत पदक जिंकले होते. 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेला ॲडम पीटी हा मेडल जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती.

British swimming star Adam Peaty tests positive for COVID
Rohan Bopanna Retirement : "देशासाठी ही माझी शेवटची टूर्नामेंट..." पराभव लागला जिव्हारी! रोहन बोपण्णाने केली निवृत्तीची घोषणा

या स्पर्धेत निकोलो मार्टिनेंगीने सुवर्णपदक जिंकले. याशिवाय ॲडम अमेरिकन जलतरणपटू निक फिंकच्या संपर्कात आला. रविवारी (२८ जुलै) सकाळी ॲडम पीटी यांची तब्येत ठीक नव्हती. मात्र तरीही त्याने अंतिम सामन्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला. अंतिम सामना खेळल्यानंतर ॲडमची प्रकृती बिघडली आणि टेस्ट केली तर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

British swimming star Adam Peaty tests positive for COVID
भावा तुझ्यासाठी काहीपण! Neeraj Chopraसाठी पठ्ठ्याने 30 देशात केली २२ हजार किलोमिटरची 'सायकल' वारी

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 बाबत कोणतेही नियम नाहीत. याआधी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 बाबत खूप कडक अॅक्शन घेण्यात आली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 ची लागण झालेला ॲडम पीटी टोकियो ऑलिम्पिकचाही एक भाग होता, जिथे त्याने चमकदार कामगिरी केली. ॲडमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदकांसह 4 पदके जिंकली होती.

British swimming star Adam Peaty tests positive for COVID
Manika Batra : मनिकाने रचला इतिहास! गेल्या १६ ऑलिम्पिकमध्ये जे घडलं नाही ते घडलं, चीनी साम्राज्य मोडून काढणार?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एक मेडल जिंकले आहे. नेमबाज मनूने महिलांच्या 10मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत तिसरं स्थान मिळवत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. आता भारताला पुढील मेडल कधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.