Paris Olympic 2024 : शाकाहारींची 'बल्ले बल्ले'; मांसाहार खाणाऱ्यांचे वांदे! जाणून घ्या खेळाडूंसाठीचा Menu

Paris Olympic 2024 Menu vegan Synthetic meat - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलैला होणार असला तरी आजपासून स्पर्धेतील फुटबॉल आणि रग्बी सामन्यांना सुरूवात होत आहे.
Paris Olympic 2024 Menu
Paris Olympic 2024 Menusakal
Updated on

Paris Olympic 2024 Menu vegan Synthetic meat - २०६ देशांतील १०,७१४ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पॅरिसमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी तेथील सरकारने खूप खर्च केला आहे आणि जगाचं लक्ष वेधलं जाईल अशी तयारी त्यांच्याकडून झालेली आहे. पण, या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी फक्त शाकाहारी जेवण ठेवलं गेलं आहे आणि त्यामुळे मांसाहार खाणाऱ्या खेळाडूंचे वांदे होताना दिसतील. पण, त्यावरही आयोजकांनी तोडगा काढला आहे आणि खेळाडूंसाठी कोणता Menu असेल हे समोर आले आहे.

कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या प्रयत्नात ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान ॲथलीट्स आणि कर्मचाऱ्यांना बहुतेक शाकाहारी अन्न दिले जाणार आहे. ऑलिम्पिक गावातील अन्न हे मुख्यतः वनस्पती आधारित असेल आणि मांस व दुग्धजन्य पदार्थ नसतील. प्राण्यांच्या मांसाचा वापर कमी करणे आणि त्यामुळे जागतिक स्पर्धेदरम्यान कार्बन फूटप्रिंट कमी करणे, हा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा हेतू आहे. पॅरिसमध्ये कार्बन फूटप्रिंट कमी करणे हे उद्दिष्ट आहे. पॅरिसमध्ये मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करण्याची भूमिका घेतली आहे.

Olympic Games Village मध्ये खेळाडू, कर्मचारी आणि मीडिया कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे १३ दशलक्ष जेवण तयार केले जाते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंदाजे ६०% अन्न वनस्पती आधारित असेल, असे अहवालात म्हटले आहे. सध्या पॅरिसने कार्बन उत्सर्जन ५०% कमी करण्याची योजना आखली आहे. मागे लंडन ऑलिम्पिकमध्ये उत्सर्जन ३.४ दशलक्ष मेट्रिक टन होते, टोक्योमध्ये ते १.९६ दशलक्ष मेट्रिक टन होते. पॅरिसने ते १.५८ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत खाली आणण्याची योजना आखली आहे.

Paris Olympic 2024 Menu
Paris Olympic 2024: भारताच्या ३५ पैकी २ पदकांवरून वाद; देशाचा पहिला ऑलिम्पियन पदकविजेता भारतीय होता का?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बहुतांश फळे आणि भाज्या दिल्या जातील, पण त्यांची निर्यात होणार नाही. त्याऐवजी, अन्नामध्ये बहुतेक स्थानिक उत्पादनांचा वापर केला जाईल. सुमारे ६०% अन्न शाकाहारी आणि वनस्पती आधारित असेल. शिवाय, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. ॲथलीट्सना सिंथेटिक मांस दिले जाईल. मांसाहाराऐवजी शाकाहारी चिकन नगेट्स आणि व्हेगन हॉट डॉग्स दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.