Paris Olympic 2024: भारतीय खेळाडूचा रूबाब! उद्घाटन सोहळ्यात दिसणार पारंपरिक वेशभूषेत; पाहा Photo

Paris Olympic 2024 Opening Ceremony: भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक सोहळ्यात पारंपारिक वेशभूषेत दिसणार असून त्यांचे फोटोही समोर आले आहेत.
India at Paris Olympic 2024 Opening Ceremony
India at Paris Olympic 2024 Opening CeremonySakal
Updated on

India at Paris Olympic 2024 Opening Ceremony: पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीच्या तीरावर या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यात जगभरातील विविध देशांतील खेळाडू सहभागी होणार असून भारताचा चमूही सज्ज आहे. यंदा भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडू आहेत. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघ अगदी पारंपारिक वेशभूषेत दिसणार आहेत.

India at Paris Olympic 2024 Opening Ceremony
Paris Olympic: ऑलिम्पिक खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम, पॅकेट्सवर मजेशीर संदेश! वेमकम किटमध्ये आणखी काय मिळालं?

या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय संघासाठी विशेष पोषाख तयार करण्यात आला आहे. भारताच्या महिला खेळाडूंनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे, त्यावर केशरी रंग छटेचा ब्लाऊज घातलेला आहे.

तसेच भारताच्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांच्या छटा साडीच्या किनारीला आहेत. त्याचबरोबर पुरुष खेळाडूंसाठी पांढरा कुर्ता, त्यावर जॅकेट आणि सलवार असा पोषाख आहे. पांढऱ्या जॅकेटच्या किनाऱ्यांनाही राष्ट्रध्वजाचे तीन रंगांची डिझाईन आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंचे या पारंपारिक वेशभूषेतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

भारतीय ध्वजधारक

यंदा पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल यांची ध्वजधारक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे हे दोघेही भारताच्या पांरपारिक वेशभूषेत ध्वजधारण करतील.

खुल्या आसमंतात उद्घाटन

आत्तापर्यंत ऑलिम्पिकचे सर्व उद्घाटन सोहळे बंदिस्त स्टेडियममध्ये झाले होते, मात्र यंदा पहिल्यांदाच खुल्या आसमंतात हा सोहळा होणार आहे. सीन नदीवर आठ किमी अंतरावर बोटीतून खेळाडूंचे संचलन होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यात जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच खेळाडूंच्या संचालनासाठी १०० बोटी असणार आहेत. हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी जवळपास दीड लाखांहून प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि जिओ सिनेमावर पाहाता येणार आहे.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.