Paris Olympic 2024: Artificial Intelligence अर्थात AI आता खेळाडूंना मदत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅरिसमध्ये 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंच्या मदतीसाठी चॅटबोट हजर राहणार आहे. इंटेल या कंपनीने चॅटबॉट तयार केले आहे आणि त्याला ॲथलिट जीपीटी (AthleteGPT) असे नाव देण्यात आले आहे. आता खेळाडूंना या तंत्राचा वापर करून त्यांच्या शंकेचं निरसन करता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि Intel यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ११ हजार खेळाडूंसाठी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. AI च्या मदतीने तयार केलेले चॅटबोट हे क्रीडापटूंना महत्त्वपूर्ण आणि वास्तविक-वेळ माहिती प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जगभरातील खेळाडूंना सामन्याचे योग्य ठिकाण आणि सामन्यासंबंधित नियम व अटी यांची सहजपणे माहिती देण्याचे काम हा चॅटबोट करणार आहे.
Intel Gaudi accelerators आणि Xenon प्रोसेसर यांच्याद्वारे टेक्नोलॉजीमधील Generation आणि RAG यावर आधारित हा चॅटबोट काम करणार आहे. पॅरिस ऑलम्पिक २०२४ मध्ये खेळाडूंना त्यांच्या 'ऑन डिमांड'वर हा चॅटबोट माहिती पुरणार आहे.
"आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांच्या भागिदारीमध्ये आम्ही AI च्या मदतीने आम्ही हे चॅटबोट तयार केला आहे. इंटेलने खेळाडूंना मदत करण्यासाठी वेगळा विचार केला आहे. तसेच ग्राहकांना अजून काय उपलब्ध करून देऊ शकतो यासंबंधित काम करत आहोत", असे इंटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि डाटा सेंटर व आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स AI चे जनरल मॅनेजर जस्टिन होटार्ड यांनी पत्रकार परीषदेमध्ये सांगितले.
इंटेलचे प्रोसेसरद्वारे आता प्रेक्षकांना 8k रिझोल्यूशनमध्ये लाईव्ह सामने पाहता येणार आहेत तसेच सामन्यादरम्यान येणारा अडथळा देखील कमी होऊन, उच्च स्क्रिनींग क्षमतेवर 32 सामने अनुभवण्यास मिळणर आहे.
'ॲथलिट GPT'चे काय फायदे आणि तोटे असू शकतात?
फायदे
जलद आणि अचूक माहिती वितरण.
सुधारित ऑपरेशनल कार्यक्षमता आणि नेव्हिगेशन समर्थन.
ऑलिम्पिक समर्थन प्रणालींमध्ये महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगती दर्शवणे.
तोटे
तंत्रज्ञानावर संभाव्य अति-अवलंबन, जे निर्णय घेण्यावर आणि खेळाडूंच्या स्वायत्ततेवर परिणाम करू शकते.
डेटा गोपनीयता आणि सायबरसुरक्षा संबंधी चिंता, संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय आवश्यक आहेत.
सर्व खेळाडूंमध्ये तंत्रज्ञानाचा समान प्रवेश सुनिश्चित करणे, कारण विषमता स्पर्धेच्या निष्पक्षतेवर परिणाम करू शकते.
इंटेलचा पुढाकार क्रीडा तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेची आणि ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याला आकार देण्यासाठीची भूमिका अधोरेखित करत असून खेळाडूंना खेळाच्या अनुभवासोबतच AI क्षमतांचे एकीकरण करून खेळाला उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.