Paris Olympic 2024: ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची अंतिम यादी जाहीर

India at Paris 2024: Complete list of athletes at the Olympic: जुलैच्या अखेरीस पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार असून यासाठी भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडू आहेत.
Paris Olympics India Players List
Paris Olympics India Players ListSakal
Updated on

Paris Olympic India contingent Players List: कोणत्याही खेळात कारकीर्द घडवणाऱ्या खेळाडूचं एक स्वप्न नक्की असतं, ते म्हणजे एकदा तरी ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावं आणि मेडलही जिंकावं. यंदा पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा खेळवली जाणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा २६ जुलै रोजी होणार असून ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता १० पेक्षाही कमी दिवस राहिलेल्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशांनी आपापले खेळाडू पॅरिसला पाठवण्यास सुरुवात केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंचीही अंतिम यादी तयार झाली आहे. या स्पर्धेत भारताच्या ११७ खेळाडूंचा ताफा सहभागी होणार आहे. भारताच्या या ताफ्यात ११७ खेळाडूंसह १४० सपोर्ट स्टाफचा समावेश आहे, ज्यात ७२ अधिकारी आहेत. या ११७ खेळाडू आणि १४० सपोर्ट स्टाफ सदस्यांचा शासनाकडून प्रवासाचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

Paris Olympics India Players List
Paris Olympic 2024: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 'GOLD' ची कहाणी; फाळणीमुळे बरेच दिग्गज पाकिस्तानात गेले, तरीही युवांचा 'जोश' High!

दरम्यान, या ११७ खेळाडूंच्या यादीत गोळाफेकपटू आभा खातुन हिचे नाव वगळण्यात आले आहे. ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली मात्र वर्ल्ड ऍथलेटिक्सच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या यादीत तिचे नाव नसल्याने कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय तिचं नाव भारताच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी सांगितल्यानुसार 2024 ऑलिम्पिक खेळांसाठी पॅरिस आयोजन समितीच्या निकषांनुसार क्रीडाग्राममध्ये ६७ अधिकाऱ्यांना राहण्याची परवानगी आहे, ज्यात ११ आयओएचे अधिकारी आणि ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इतरांची सोय क्रीडाग्रामबाहेर हॉटेल्समध्ये शाननाच्या अर्थिक मदतीने करण्यात आली आहे.

Paris Olympic India Players list
Paris Olympic India Players list

भारताच्या ताफ्यात ११७ खेळाडूंमध्ये सर्वाधिक ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत. यात ११ महिला आणि १८ पुरुष असे २९ ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत. त्यानंतर २१ खेळाडू नेमबाजीत सहभागी होणार आहे.

Paris Olympic India Players list
Paris Olympic India Players list

भारताच्या हॉकी संघात १९ खेळाडू आहेत. टेबल टेनिसचे ८ आणि बॅडमिंटनमध्ये ७ खेळाडू सहभागी होणार आहेत. कुस्ती, तिरंदाजी आणि बॉक्सिंग या खेळांत प्रत्येकी ६ खेळाडू सहभागी होणार आहेत.

Paris Olympic India Players list
Paris Olympic India Players list

गोल्फमध्ये ४, टेनिसमध्ये ३, स्विमिंगमध्ये २ आणि सेलिंगमध्ये २ खेळाडूंना संधी मिळाली आहे. घोडेस्वारी, ज्युदो, रोइंग आणि वेट लिफ्टिंग या खेळांचे प्रत्येकी १ खेळाडू भारताच्या ताफ्यात आहे.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.