Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी; वाचा नक्की काय आहे भानगड

Know All About Paris Paralympics 2024 Medals: जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी एकूण 5084 पदके तयार करण्यात आली आहेत. यातील मेडल्समध्ये 18-ग्राम हेक्सागन टोकन असणार आहे.
Paris Olympics 2024 And Eiffel Tower Connection
Paris Olympics 2024 And Eiffel Tower ConnectionEsakal
Updated on

पॅरिस ऑलिम्पिक सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यासाठी भारतीय खेळाडू आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे. यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये विजेत्यांना मिळणाऱ्या पदकांमध्येही एक बदल असणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या आयोजकांनी या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पदकांचे अनावरण केले होते. यावेळी पदक जिंकणारे खेळाडू फक्त पदक नव्हे तर आयफेल टॉवरचा एक तुकडाही घरी घेऊन जातील. कारण यंदा पदकाचा काही भाग आयफेल टॉवरच्या तुकड्यांचा बनलेला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान, तर पॅरालिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत.

पदकांमध्ये आयफेल टॉवरचा धातू

जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी एकूण 5084 पदके तयार करण्यात आली आहेत. यातील मेडल्समध्ये 18-ग्राम हेक्सागन टोकन असणार आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या आयफेल टॉवरच्या स्मारकाच्या नूतनीकरणादरम्यान त्यातून निघालेल्या लोखंडापासून यंदाची पदके बनवलेली आहेत.

Paris Olympics 2024 One Side Of Medals
Paris Olympics 2024 One Side Of MedalsEsakal

पदकाच्या दुसऱ्या बाजूची अनोखी गोष्ट

प्रत्येक ऑलिम्पिक गेम्सप्रमाणे, यंदाही ऑलिम्पिक पदकाची दुसरी बाजू ग्रीसमधील ऑलिम्पिक गेम्सच्या पुनर्जन्माची कथा सांगते, ज्यामध्ये विजयाची देवी आणि एलेना व्होत्सीने अथेन्स ऑलिम्पिक्स 2004 साठी डिझाइन केलेल्या स्टेडियमचा समावेश आहे.

2004 पासून पदकाचे एक पारंपारिक वैशिष्ट्य म्हणजे विजयाची देवी, अथेना नायके, पॅनाथेनाइक स्टेडियममधून समोरच्या बाजूने बाहेर पडतानाचे चित्र आहे. हे स्टेडियम 1896 मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या पुनरुज्जीवनाचे साक्षीदार होते.

अशा प्रकारे, ग्रीसमधील प्राचीन खेळांची प्रेरणा, आधुनिक ऑलिम्पिक खेळांची फ्रेंच उत्पत्ती आणि पॅरिसमधील त्यांची पुढील स्पर्धा या सर्व गोष्टींचे यंदाचे मेडल्स प्रतिनिधित्व करतात. जाते.

Paris Olympics 2024 Another Side Of Medals
Paris Olympics 2024 Another Side Of MedalsEsakal
Paris Olympics 2024 And Eiffel Tower Connection
Paris Olympic 2024: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 'GOLD' ची कहाणी; फाळणीमुळे बरेच दिग्गज पाकिस्तानात गेले, तरीही युवांचा 'जोश' High!

पॅरालिम्पिक पदक

याचबरोबर पॅरालिम्पिक पदकांवर आयफेल टॉवरचे चित्र असणार आहे. त्याचबरोबर त्यावर 'टॉवर फ्रॉम पॅरिस 2024' असे ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले आहे. याद्वारे फ्रेंच लेखक लुई ब्रेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

दृष्टिहीन खेळाडूंना पदकांमध्ये फरक करता यावा यासाठी, बाजूला डॅश कोरलेले आहेत. यामध्ये सुवर्ण पदकासाठी I, रौप्य पदकासाठी II आणि कांस्य पदकासाठी III डॅश आहेत.

Paris Paralympics 2024 Medals
Paris Paralympics 2024 MedalsEsakal
Paris Olympics 2024 And Eiffel Tower Connection
Paris Olympic 2024 : मजुरी करून आईने वाढवलं; ऑलिम्पिक गाजवून तिला भेट द्यायचीय! ज्योतीची भावनिक गोष्ट

पदकांचे डिझाईन कोणी केले?

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या आयोजकांनी LVMH ज्वेलर चाउमेटला पदकांचे डिझाईन करण्याचे काम दिले होते. आपल्या कारागिरीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या, चौमेटने षटकोन, चमक आणि रत्न-सेटिंग या तीन प्रेरणा स्त्रोतांवर आधारित पदक तयार केले आहे, आणि या पदकांचे रूपांतर खऱ्याखुऱ्या दागिन्यांमध्ये केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.