Paris Olympic 2024 : चालण्याच्या शर्यतीत भारतीयांची ‘चाल' बिघडली; अक्षदीप, विकास सिंग, परमजितसिंग अपयशी

१२ वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये के. टी. इरफानने १० वे स्थान मिळविले होते. ही भारतीय ॲथलिटने पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
paris olympics 2024 vikash singh best finish in 20km race walk akshdeep singh fails to complete
paris olympics 2024 vikash singh best finish in 20km race walk akshdeep singh fails to completeSakal
Updated on

पॅरिस : १२ वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये के. टी. इरफानने १० वे स्थान मिळविले होते. ही भारतीय ॲथलिटने पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. या वेळी यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तीन स्पर्धक असूनही एकालाही पहिल्या २० स्पर्धकांत स्थान मिळविता आले नाही. महिलांच्या शर्यतीतही प्रियांका गोस्वामीला विशेष कामगिरी करता आली नाही.

अक्षदीप सिंग, विकास सिंग व परमजितसिंग बिश्त हे तिघेही पात्रता पार करून पॅरिसमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यांना आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या आसपासही पोहोचता आले नाही. प्रसिद्ध अशा आयफेल टॉवर परिसरात झालेल्या या शर्यतीत विकास सिंगला ३० वे, परमजितसिंग बिश्तला ३७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

विकासने ही शर्यत एक तास २२ मिनिटे ३६, तर परमजितने एक तास २३ मिनिटे ४६ सेकंदात पूर्ण केली. पावसामुळे उशिराने सुरू झालेल्या या शर्यतीत ४९ ॲथलिट्‍स सहभागी झाले होते. त्यापैकी एक जण अपात्र ठरला, तर दोघांना शर्यत पूर्ण करता आली नाही. त्यात भारताच्या अक्षदीप सिंगचा समावेश आहे.

paris olympics 2024 vikash singh best finish in 20km race walk akshdeep singh fails to complete
Paris Olympic 2024 : खाशाबांचा वारस कोल्हापुरातच जन्मला! ऑलिंपिक गाजवणारा दुसरा कोल्हापूरकर

प्रियांका गोस्वामी ४१ वी

राष्ट्रकुल व आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामीची ४१ व्या स्थानावर घसरण झाली. तिने ही शर्यत एक तास ३९ मिनिटे ५५ सेकंदात पूर्ण केली. यामुळे ती आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपासून तब्बल ११ मिनिटे दूर राहिली. यात ४५ जणींचा सहभाग होता. त्यापैकी दोघींना शर्यत पूर्ण करता आली नाही.

पहिले सुवर्णपदक इक्वेडोरला

पुरुषांची शर्यत प्रथम सुरू झाली. त्यात इक्वेडोरच्या ब्रायन पिंटाडोने एक तास १८ मिनिटे ५५ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये १९९६ नंतर इक्वेडोरचे हे पहिले सुवर्णपदक होय. त्या वेळी जेफरसन पेरेझने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतच सुवर्णपदक जिंकले होते.

paris olympics 2024 vikash singh best finish in 20km race walk akshdeep singh fails to complete
Paris Olympic 2024 : पॅरिसमधल्या हॉटेल्सना पर्यटकांची नापसंती

ब्राझीलच्या किओ बेनफिमने एक तास १९ मिनिटे नऊ सेकंदात रौप्यपदक जिंकले. दोन वेळच्या विश्वविजेत्या स्पेनच्या अल्वारो मार्टिनला एक तास १९ मिनिटे ११ सेकंदात ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शर्यतीत पुन्हा एकदा चीनच्या ॲथलिटने वर्चस्व गाजविले. महिलांची शर्यत सातव्यांदा आयोजित करण्यात आली होती.

त्यापैकी चौथे सुवर्णपदक चीनच्या ॲथलिटने मिळविले. ही शर्यत २०१७ च्या विश्वविजेत्या यांग जियु हिने एक तास २५ मिनिटे ५४ सेकंदात जिंकली. स्पेनच्या मारिया पेरेझला एक तास २६ मिनिटे १९ सेकंदात रौप्य, तर विश्व स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या जेमिमा मोंतांगने एक तास २६ मिनिटे २५ सेकंदात ब्राँझपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.