Manu Bhaker : मनू भाकरच्या ट्रेनिंगसाठी सरकारकडून कोट्यवधी खर्च! क्रीडा मंत्र्यांनी दिलं मोदींच्या 'या' योजनेला क्रेडिट

Olympics 2024 Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आणि भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले.
Olympics 2024 Manu Bhaker
Olympics 2024 Manu Bhakersakal
Updated on

Olympics 2024 Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आणि भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली. 22 वर्षीय भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

मनूच्या पदकासह भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाचे खाते उघडले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकल्याबद्दल भाकरचे संपूर्ण देशातून अभिनंदन होत आहे.

यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही हरियाणाच्या नेमबाज मनूचे देशाला गौरव मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मनूबाबत एक खुलासा केला. मनूच्या ट्रेनिंगवरही सरकारने 2 कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

Olympics 2024 Manu Bhaker
Paris Olympic 2024: पिक्चर अभी बाकी है ! मनू भाकर करणार 124 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती? भारतासाठी इतिहास घडवण्याची मोठी संधी...

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, सरकारच्या 'खेलो इंडिया' कार्यक्रमाचा भाग असणे केवळ मनू भाकर यांच्यासाठी पॅरिस 2024 च्या तयारीसाठी फायदेशीर ठरले नाही तर इतर खेळाडूंनाही मदत झाली आहे.

मनसुख मांडविया हे असेही म्हणाला की, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की पंतप्रधान मोदींनी ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत देशात क्रीडा सुविधा निर्माण झाल्या आणि क्रीडा स्पर्धांची संख्या पण वाढवण्यात आली, तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर क्रीडा स्पर्धा ओळखण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. गुणवंतांची ओळख व्हावी, यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये चांगले प्रशिक्षक ठेवण्यात आले. याशिवाय, TOPSद्वारे, जी भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली योजना आहे, खेळाडूंना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात आली.

Olympics 2024 Manu Bhaker
Manu Bhaker : इंस्टाग्रामवर फक्त 10 मिनिटे... गुरु जसपाल राणाचा 'तो' गुरुमंत्र ठरला मनूसाठी किंगमेकर, काही महिन्यांपूर्वीच...

पुढे ते म्हणाले की, मनू भाकरच्या प्रशिक्षणावर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाल्याचेही मांडविया यांनी सांगितले. तिला जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिला आवश्यक आर्थिक मदत देण्यात आली होते, जेणेकरून ती त्याच्या आवडत्या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेऊ शकेल. खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता यावी यासाठी आम्ही या सर्व गोष्टी आमच्याकडून शक्य तितक्या त्यांना देत आहोत. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही आमचे खेळाडू चांगली कामगिरी करतील, असा मला विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.