Vinesh Phogat Faints: विनेश फोगाट चक्कर येऊन पडली, हॉस्पिटलमध्ये करावं लागलं भरती

Vinesh Phogat Faints Due to Dehydration in Paris: विनेश फोगटला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेत तिला खेळता येणार नाही.
vinesh phogat
vinesh phogatesakal
Updated on

Vinesh Phogat Disqualified Rule: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला डिहायड्रेशनमुळे चक्कर आल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते आणि ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती. त्यामुळे तिला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जेव्हा तिला अपात्र ठरवले गेले, तेव्हा तिला चक्कर आली आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

विनेशच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदकं आहेत आणि तिने २०१८ च्या आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले आहे. २०२३च्या आशियाई स्पर्धेत तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. याशिवाय तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्यपदकं आहेत आणि दोन्ही पदकं तिने ५३ किलो वजनी गटात जिंकलेली आहेत. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत दोन रौप्य व पाच कांस्यपदकं जिंकली आहेत. २०१६ मध्ये साक्षी मलिक ही भारताकडून कुस्तीत पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.

vinesh phogat
Vinesh Phogat: सलाम! काही महिन्यापूर्वी रस्त्यावरून फरफटत नेले, काल आठ तासात बनली देशाची सुपरहिरो; आम्हाला माफ कर

विनेश फोगाटला अपात्र का ठरली?

विनेश फोगटला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे आणि बुधवारी सकाळी झालेल्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेत तिला खेळता येणार नाही आणि त्यामुळे तिला ऑलिम्पिक पदक गमवावे लागणार आहे. विनेशला आज संध्याकाळी अंतिम फेरीत यूएसएच्या सारा हिल्डरब्रँडचा सामना करावा लागणार होता, परंतु तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र ठरवले गेले.

vinesh phogat
Vinesh Phogat disqualified: विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर कोणतं पदक मिळणार? नेमकं काय होणार?

नियमांनुसार, कुस्तीपटूंना प्राथमिक फेरीच्या दिवशी आणि अंतिम फेरीच्या सकाळी असे दोनदा वजन करावे लागते. मंगळवारी सकाळी विनेश ५० किलो वजनाच्या मर्यादेत होती. तिचे वजन दिवसभरात वाढले असण्याची शक्यता आहे, कारण तिला रात्रभर सुमारे २ किलो वजन कमी करावे लागले, परंतु आज सकाळी तिचे वजन 100 ग्रॅमने जास्त होते. याचा अर्थ विनेशलाही अपात्र ठरवण्यात आल्याने तिचे पदक गमवावे लागणार आहे. ५० किलो गटात एक सुवर्णपदक आणि दोन कांस्यपदक मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.