पॅरिस : भारताचा २६ वर्षीय ॲथलीट सुमीत अंतिल याने टोकियोसह पॅरिस पॅरालिंपिकमध्येही सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. पॅरिसमधील क्रीडा महोत्सवातील भालाफेकीत ७०.५९ मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सुमीत याने यशाचे रहस्य उलगडताना म्हटले की, माझ्या आवडत्या गोड पदार्थांचा त्याग करावा लागला. तीन ते चार रात्री झोप लागली नाही, मात्र याचे फळ मला सुवर्णपदकाच्या रूपात मिळाले.