Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल

Paris Olympics 2024 players Reached : खेळाडूंचे निवासस्थान असणारी क्रीडानगरी आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आले.
Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल
Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखलsakal
Updated on

क्रीडा जगतासाठी सर्वात मोठा कुंभमेळा असणारी ऑलिंपिक स्पर्धा सात दिवसांवर आली आहे आणि त्यासाठी सहभागी होणारे वारकरी पॅरिसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. खेळाडूंचे निवासस्थान असणारी क्रीडानगरी आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आले.

या पॅरिस ऑलिंपिकसाठी आज शुक्रवारी आलेल्या काही खेळाडूंचे स्वागत आंतरराष्ट्रीय ऑलिंपक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी स्वतः केले. येत्या २७ तारखेला उद्घाटन होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये २०६ देशांचे सूमारे १०,५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंच्या निवासासाठी ५४ एकर परिसरात क्रीडाग्राम तयार करण्यात आले आहे. सीन नदीच्या किनारी ही निवास व्यवस्था असणार आहे.

नेमबाजी, बास्केटबॉल (प्राथमिक फेरी), हँडबॉल, सेलिंग आणि सर्फिंग आदी खेळ शैटोरॉक्स, लिले, मार्सिले आणि ताहिती या ठिकाणी होणार आहेत. तेथेही अतिरिक्त क्रीडाग्राम तयार करण्यात आले आहे.

क्रीडानगरीच्या उद्घाटनप्रसंगी थॉमस बाख. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचे अध्यक्ष टोनी एस्टान्गुएट आणि आयओसीचे समन्वय आयोगाचे अध्यक्ष पियरे-ऑलिव्हियर बेकर्स हेसुद्धा उपस्थित होते.

Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल
Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी; वाचा नक्की काय आहे भानगड

अखेर आम्ही येथे दाखल झालो आहोत, असे सांगत काही खेळाडूंनी निवासाच्या सुविधांचे कौतुक केले. सात वर्षांच्या तयारीचा हा प्रवास आता पूर्णत्वास येत आहे आणि त्यासाठी टोनी एस्टान्गुएट यांचे विशेष आभार मानायला हवेत, अशी भावना समन्वय आयोगाचे अध्यक्ष पियरे ऑलिव्हियर बेकर्स यांनी व्यक्त केली.

स्पर्धा संपल्यावरही उपयोग

स्पर्धा संपल्यानंतरही क्रीडानगरीचा उपयोग केला जाणार आहे. सीन-सेंट-डेनिस नावाने हा परिसर ओळखला जाईल. हाऊसिंग, दुकाने, जनतेसाठी विविध सुविधा, कार्यालय आणि हिरवळ तयार करण्यात येणार आहे. सहा हजार निवास व्यवस्था असेल आणि त्यासाठी किमान सहा हजार लोकांना रोजगार मिळू शकेल.

क्रीडानगरी मधील खेळाडूंच्या रहाण्यासाठी इमारती अशा प्रकारे तयार करण्यात आल्या आहेत की त्यावर हवामानातील बदलाचा परिणाम होणार नाही.

Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल
Paris Olympic 2024 : मजुरी करून आईने वाढवलं; ऑलिम्पिक गाजवून तिला भेट द्यायचीय! ज्योतीची भावनिक गोष्ट

अशी आहे सुविधा

खेळाडूंच्या भोजनासाठी ३२०० खुर्च्यांचा डायनिंग हॉल आहे, २४ तास जिम सुरू असणार आहे. ३,५०० स्क्वेअर मिटरवर पॉलिक्लिनिक, तसेच एक छोटेखानी सुपरमार्केटही असणार आहे.

स्पर्धेसाठी क्रीडाग्राममध्ये राहणाऱ्या खेळाडूंना कोणतीही कमतरता राहणार नाही. ऑलिंपिक समितीने पाचही खंडांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून येथील वातावरणनिर्मिती आणि तयारीसाठी त्यांच्यांकडून अभिप्राय मागवला आणि त्यानंतर बदल करत त्रुटी कमी केल्या.

ॲथलीट ३६५ स्पेस

ऑलिंपिकमधील सर्व सामने, स्पर्धा-शर्यतींचे थेट प्रक्षेपण पहात ॲथलीट कोठूनही एकमेकांशी संपर्कात राहू शकतात, चर्चा करू शकतात. त्यासाठी ॲथलीट ३६५ स्पेस ही योजना तयार करण्यात आली आहे.

डोपिंगसंदर्भात प्रबोधन

एकीकडे खेळाडूंसाठी सर्व सुविधा दिल्या जात असताना आयओसीच्या सहकार्याने उत्तेजक चाचणी प्रतिबंधक, मॅच फिक्सिंग आदी धोक्यांपासून इशारा आणि प्रबोधनही सातत्याने करण्यात येणार आहे.

Paris Olympics 2024: पॅरिसच्या 'पंढरीत' 'वारकऱ्यां'चे आगमन; ऑलिंपिकच्या क्रीडानगरीचे उद्घाटन ;खेळाडू दाखल
Paris Olympic 2024 : पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतरही पूर्ण केले तिला दिलेलं वचन! हिंमत न हरता त्याने जिंकले Gold!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.