PR Sreejesh India flagbearer olympic 2024: भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी स्पेनला पराभूत करून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं कांस्यपदक पटकावलं. ५२ वर्षानंतर पुरुष हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. हा सामना भारतीय खेळाडूंसाठी भावनिक होता, कारण प्रमुख गोलरक्षक पी आर श्रीजेश यानंतर टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार नव्हता. हा त्याचा निवृत्तीचा सामना होता. त्यामुळेच सामन्यानंतर खेळाडूंनी त्याला कुर्निसात केला...
भारतीय हॉकीसाठी श्रीजेशने केलेल्या त्यागाची सर्वांना जाण आहे आणि म्हणून रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानेही आपल्या कृतीतून ती व्यक्त केली. महान गोलरक्षक पी आर श्रीजेश याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड केली गेली आहे. नेमबाज मनु भाकर ( Manu Bhaker) हिची आधीच निवड केली असल्याने मनु व श्रीजेश दोघंही ध्वजवाहक असतील. Closing Ceremony of the Olympic 2024
IOA अध्यक्ष डॉ पीटी उषा म्हणाल्या की, शेफ डी मिशन गगन नारंग आणि संपूर्ण भारतीय दलासह IOA नेतृत्वामध्ये श्रीजेशची निवड करणे हा भावनिक क्षण होता. श्रीजेशने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय हॉकी संघाची सेवा केली आहे. उषा यांनी संदर्भात भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याशी चर्चा केली होती. नीरजने गुरुवारी मध्यरात्री भालाफेकीत रौप्यपदक जिंकले होते.
"मी नीरज चोप्रा याच्याशी बोलले आणि श्रीजेश समारोप समारंभात ध्वजवाहक असावा यावर चर्चा केली. त्याने क्षणाचाही वेळ न दवडता आनंदाने यावर सहमती दर्शवली. तो म्हणाला,'मॅम जरी तुम्ही मला विचारले नसते तरी श्री भाईचं नाव सुचवलं असतं.' नीरजच्या मनात श्रीजेशप्रती प्रचंड आदर आहे.''
IOA ने नेमबाज मनु भाकरच्या नावाची आधीच घोषणा केली होती. मनुने पॅरिसमध्ये १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं जिंकून इतिहास घडवला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.