Paris Olympics 2024 : ऑलिंपिकचा प्रचंड दबाव; ‘नीरज तंदुरुस्त; पण आकडेवारीवरून पदक गृहीत धरणे चुकीचे’ - क्लाऊस बार्टोनिट्‌झ

यंदाच्या मोसमात जगभरातील भालाफेकपटूंना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये सर्वच खेळाडूंना पदक जिंकण्याची संधी असणार आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी होताना प्रचंड दबाव असणार आहे.
pressure of paris Olympics 2024 Neeraj is fit But it is wrong to assume medal from statistics Klaus Bartonietz
pressure of paris Olympics 2024 Neeraj is fit But it is wrong to assume medal from statistics Klaus BartonietzSakal
Updated on

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात जगभरातील भालाफेकपटूंना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये सर्वच खेळाडूंना पदक जिंकण्याची संधी असणार आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी होताना प्रचंड दबाव असणार आहे.

त्यामुळे मागील आकडेवारीवर नजर टाकून पदकाची आशा बाळगणे चुकीचे ठरणार आहे, असे स्पष्ट मत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे प्रशिक्षक क्लाऊस बार्टोनिट्‌झ यांच्याकडून रविवारी व्यक्त करण्यात आले.

क्लाऊस बार्टोनिट्‌झ यांनी नीरज चोप्रा याच्या तंदुरुस्तीबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, नीरज चोप्रा तंदुरुस्त आहे. आम्ही आखलेल्या योजनेनुसार सर्व काही सुरू आहे. ऑलिंपिकपर्यंत असेच सुरू राहायला हवे.

सरावाबाबत ते सांगतात की, सध्या दिवसाला दोन सराव सत्रात मेहनत घेतली जात आहे. एक सराव सत्र सकाळी, तर दुसरे सराव सत्र संध्याकाळी घेतले जात आहे. जम्प करणे, धावणे, वेटलिफ्टिंग, थ्रो अशा टप्प्यात आम्ही सराव करीत आहोत. प्रत्येकी अडीच तासांचे एक सत्र आयोजित करण्यात येत आहे.

...म्हणून सरावावर लक्ष

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने यंदा अधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापेक्षा कसून सरावावर लक्ष दिले. याबाबत क्लाऊस बार्टोनिट्‌झ म्हणाले, भालाफेकपटूंसाठी सराव महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या धावपट्टीवर खेळाडू धावून भाला फेकतो, त्यावर धावताना वेग अत्यंत आवश्‍यक असतो. पाय मजबूत असायला हवे. त्यानंतरच दूरवर भाला फेकता येतो. याच कारणामुळे नीरजने सरावावर भर दिला आहे.

पत्त्यांच्या खेळाप्रमाणे

क्लाऊस बार्टोनिट्‌झ याप्रसंगी स्पष्ट करतात की, जगभरातील अव्वल दर्जाचे भालाफेकपटू कसून सराव करीत आहेत. पॅरिसमध्ये प्रत्येकाला पदक जिंकायचे आहे. नीरज पॅरिसमध्ये पदक हमखास जिंकेल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

भालाफेक हा खेळ पत्त्यांच्या खेळाप्रमाणे आहे. कधी कधी ८८ मीटर भाला फेकल्यानंतरही पदक मिळत नाही; पण कधी कधी ८५ मीटर भाला फेकल्यानंतरही पदक मिळू शकते. तुम्ही फॉर्मात असल्यास दूरवर भाला फेकण्यातही यश मिळू शकते.

काही फरक पडत नाही!

टोकियो ऑलिंपिकआधी नीरज चोप्रा पाच स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता; पण पॅरिस ऑलिंपिकआधी तो फक्त तीनच स्पर्धांमध्ये खेळला. यावर क्लाऊस बार्टोनिट्‌झ म्हणाले, झेक प्रजासत्ताकचे महान भालाफेकपटू जॅन झेलेनी यांनी १९९२मधील ऑलिंपिकआधी दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता; पण त्यानंतरही त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. सातत्याने स्पर्धा खेळल्यानंतरही सरावात अडथळा येऊ शकतो. अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे जिकिरीचे ठरू शकते. याशिवाय प्रवासामुळे वेळही वाया जातो.

पॅरिस लीगमधून माघार

क्लाऊस बार्टोनिट्‌झ यांनी नीरज चोप्रा याने पॅरिस डायमंड लीगमधून का माघार घेतली, याचे कारणही सांगून टाकले. ते म्हणाले, काही छोट्या बाबींकडे आम्ही लक्ष दिले. पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी झाल्यानंतर पुढे जाऊन नुकसान होण्याची शक्यता होती.

कारण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर दुखापत झाली असती तर मग ऑलिंपिकच्या तयारीवर परिणाम होऊ शकला असता. तसेच, ही स्पर्धा जिथे खेळवण्यात येत होती, ते ऑलिंपिक स्टेडियम नव्हते. त्यामुळे पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेणेच पसंत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.