Vinesh Phogat Disqualified: 'संघर्षाचं नाव विनेश आहे...', गीता फोगट, बजरंग पुनियासह पीव्ही सिंधूनेही दिला धीर

Wrestler Vinesh Phogat disqualified: कुस्तीपटू विनेश फोगटचं वजन १०० ग्रॅम अधिक भरल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आले, याबाबत आजी-माजी खेळाडूंनीही पोस्ट करत तिला धीर दिला आहे.
Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Vinesh Phogat disqualified from Paris Olympics 2024: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र बुधवारी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिचे पदकही हुकले. असे असताना सध्या देशभरातून तिच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्याप्रती अनेकांनी सहानुभूतीही व्यक्त केली आहे.

भारताच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनीही तिच्याबाबत पोस्ट करत तिला धीर दिला आहे.

भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने पोस्ट करत लिहिले की, 'प्रिय विनेश फोगट, तू आमच्या नजरेत नेहमीच चॅम्पियन आहेस. तू सुवर्णपदक जिंकावेस अशी मी मनापासून आशा करत होते. PDCSE मध्ये तुझ्यासोबत घालवलेल्या थोड्या वेळेत मी तुझ्या रुपात एका सुपरमानव असलेल्या स्त्रीला सर्वोत्तम होण्यासाठी झुंज देताना पाहिले. ते प्रेरणादायी होते. मी तुझ्यासाठी नेहमीच उभी आहे आणि तुला सर्व सकारात्मकता पाठवत आहे.'

Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat: "लेकीचा विजय म्हणजे बृजभूषण सिंह यांच्या कानाखाली जाळ" ; विनेशच्या विजयावर महावीर फोगाट भावूक, काय म्हणाले वाचा...

याशिवाय विनेशची चूलत बहीण गीता फोगटने लिहिले, 'बहिण विनेश, तू आमची गोल्डन गर्ल आहे, जिला इतिहासात नेहमीच लक्षात ठेवले जाईल. जिंदगी एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षाचे नाव विनेश आहे.'

'एका क्षणी तू ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहचून इतिहास रचतेस आणि पुढच्याच क्षणी दुर्दैवाने हातून सर्व निसटते. बहिणी, तू आत्ता जे काही अनुभवत आहेस, त्याचा आम्ही अंदाजही लावू शकत. पण खऱ्या भारतीयांचे डोळे आज पाणावले आहेत. चॅम्पियन हा नेहमीच चॅम्पियन असतो.'

इतकेच नाही, तर बजरंग पुनियानेही तिच्यासाठी पोस्ट करत तिला धीर दिला आहे. त्याने लिहिले, 'विनेश तू हिंमत आणि नैतिकतेची गोल्ड मेडलिस्ट आहेतस. मातीतील लेक आहेस, म्हणूनच मेडलही मातीचं आहे. खूप धैर्याने लढली आहेस.'

Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat: 'विनेशचं वजन एका रात्रीत कसं वाढलं हे फक्त प्रशिक्षक आणि पोषणतज्ञच सांगू शकतात', WFI अध्यक्षांचं मोठं व्यक्तव्य

बजरंगने पुढे लिहिले, 'काल जेव्हा खेळण्यापूर्वी ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्यांनी तुझे वजन तपासले, तेव्हा ते एकदम योग्य होते. आज सकाळी जे झाले, त्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा नाही. १०० ग्रॅम, विश्वास बसत नाहीये की तुझ्याबरोबर काय झाले. संपूर्ण देशाच्या डोळ्यात अश्रू आहेत. सर्व देशांचे ऑलिम्पिक मेडल एकीकडे आणि तुझं मेडल एकीकडे.

जगातील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रत्येक महिलेला हे त्यांचे वैयक्तिक मेडल असल्यासारखे वाटत आहे. जगातील सर्व महिलांचा हा आवाज योग्य ठिकाणी पोहोचावा हीच इच्छा. मला आशा आहे की ऑलिम्पिक खेळणाऱ्या जगातील सर्व महिला कुस्तीपटू विनेशच्या पाठीशी एकजुटीने उभ्या राहतील.'

खरंतर विनेशला बुधवारी सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. ती ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहचणारी भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू होती. मात्र आता तिला पदकाला मुकावे लागले आहे.

दरम्यान, यानंतर असेही वृत्त समोर आले होते की वजन कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर डीहायड्रेशनमुळे विनेशला चक्कर आली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.