Vinesh Phogat: काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला रेल्वेचा दणका, कारणे दाखवा नोटीस जाहीर

Railways served show cause notice to Vinesh Phogat: काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला रेल्वेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Railways served show cause notice to Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात तिचे पदक थोडक्यात हुकले होते. त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्तीही घेतली. आता दोनदिवसांपूर्वीच तिने राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश केला आहे.

तिने कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच तिला हरियाणातून काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी उमेदवारीही दिली.

अशातच आता असे समोर आले आहे की रेल्वेकडून विनेशला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पुष्टी करण्यात आली आहे. विनेश रेल्वेमध्ये नोकरीला होती.

Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat Salary: काँग्रेसचा 'हात' धरण्यासाठी विनेशने किती रुपयांच्या पगारावर मारली 'लाथ'? डोकं चक्रावेल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.