India at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची २१ वर्षीय रितिका हुडा ही महिलांच्या फ्रिस्टाईल ७६ किलो वजनी गटात सहभागी झाली होती. ती या स्पर्धेत भारताला पदक जिंकून देण्यासाठी अखेरची आशास्थान आहे. पण तिला सुवर्णपदक जिंकण्याची संधी नाही कारण तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
रितिकाने पहिल्या सामन्यात हंगेरीच्या बर्नाडेट नागी हिला १२-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. ती ७६ किलो या हेवी वेट कॅटेगरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला अव्वल मानांकित आणि दोनवेळची वर्ल्ड चॅम्पियनशीप पदक विजेत्या किर्गिस्तानच्या आयपेरी मेडेट किझीने पराभूत केले.
परंतु, आता जर किझी अंतिम सामन्यात गेली, तर रितिकाला कांस्य पदकासाठी रेपेचेस खेळण्याची संधी मिळू शकते.