Vinesh Phogat disqualification in Paris Olympics 2024 Case: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरण्याचे प्रकरण गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे.
विनेशने या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून फारशी मदत मिळाली नसल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण आता ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी असा दावा केला आहे की क्रीडा लवादाने तिच्याविरुद्ध दिलेल्या निकालाच्या विरोधात आव्हान न देण्याचा निर्णय तिचा होता.
विनेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यापर्यंतही पोहचली होती. ती ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटूही होती.
मात्र, अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन नियमानुसार साधारण १०० ग्रॅम अधिक भरलं, यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.