Paris Olympic 2024 : शा कारी रिचर्डसन अमेरिकेचा २८ वर्षांचा दुष्काळ संपविणार?

Sha Carri Richardson women 100m : ऑलिंपिकमध्ये आज महिलांची शंभर मीटर धावण्याची शर्यत
Sha Carri Richardson reach women 100m semis paris olympic 2024 america after 28 years
Sha Carri Richardson reach women 100m semis paris olympic 2024 america after 28 yearsSakal
Updated on

पॅरिस : ऑलिंपिक असो की जागतिक स्पर्धा, ॲथलेटिक्समधील शंभर मीटरची शर्यत नेहमीच आकर्षणाचे केंद्र असते. पॅरिस ऑलिंपिकही त्यास अपवाद नसून त्यापैकी महिलांमधील वेगवान धावपटू कोण हा फैसला उद्या, शनिवारी लागणार आहे.

दावेदार अनेक असले, तरी अमेरिकेची शा कारी रिचर्डसन ही प्रबळ दावेदार आहे. शेरीका जॅक्सनने माघार घेतल्याने २००८ व २०१२ ची विजेती व ‘पॉकेट रॉकेट’ म्हणून ओळखली जाणारी ३७ वर्षीय शेली ॲन फ्रेसर प्रिसे हिच्यावर जमैकाची मदार आहे.

शंभर मीटर शर्यतीत अमेरिका विरुद्ध जमैका ही चुरस कायमच पाहायला मिळते. गत चार ऑलिंपिकमध्ये जमैकाच्या धावपटूने सुवर्णपदकावर नाव कोरले असून ही विजयी मालिका खंडित करण्यासाठी २४ वर्षीय शा कारी सज्ज झाली आहे.

२००० च्या सिडनी ऑलिंपिकमध्ये मेरियन जोन्सने सुवर्णपदक जिंकले होते, मात्र डोपिंगमध्ये अडकल्याने तिचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले. त्यापूर्वी १९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये गेल डेव्हर्सने अमेरिकेला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

Sha Carri Richardson reach women 100m semis paris olympic 2024 america after 28 years
Paris Olympic 2024: भारताच्या अंकिता-धीरजने उंचावल्या आशा, तिरंदाजीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

तेव्हापासून महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदकाने अमेरिकेला हुलकावणी दिली आहे. स्प्रिंट शर्यतीत दबदबा असूनही तब्बल २८ वर्षांचा दुष्काळ संपविण्याची जबाबदारी छोट्या चणीच्या शा कारी रिचर्डसनवर आहे.

यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान वेळ तिच्या नावावर असून गतवर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने नवव्या लेनमधून धावताना जमैकन धावपटूंना विशेषतः शेली व शेरीकाला धक्का देत १०.६५ सेकंदाच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. टोकियोत शा कारीची संधी थोडक्यात हुकली होती. त्यामुळे आपल्या पहिल्याच ऑलिंपिकमध्ये धमाका करण्यास ती सज्ज आहे.

Sha Carri Richardson reach women 100m semis paris olympic 2024 america after 28 years
Paris Olympic 2024: मनु भाकर फायनलमध्ये! नेमबाज इतिहास रचणार, एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करणार?

शा कारी दावेदार असली तरी तिच्यापुढे शेली ॲन प्रमाणेच जमैकाची १९ वर्षीय टिया क्लेटन, शा कारीची अमेरिकेतील सरावातील सहकारी व सेंट ल्युशियाची ज्युलियन अल्फ्रेड, अमेरिकेचीच ट्विंशा टेरी, मेलिसा जेफरसन ही नावे प्रमुख आहेत.

टिया क्लेटनने यंदा जमैकाच्या निवड चाचणीत १०.८६ सेकंद अशी वेगवान वेळ दिली होती, तर ज्युलियन अल्फ्रेडने यंदा जागतिक इनडोअर स्पर्धेत ६० मीटरचे सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती सेंट ल्युशियाची पहिली खेळाडू ठरली होती.

शंभर मीटर शर्यतीत तिची सर्वोत्तम वेळ १०.७८ सेकंद आहे. त्यामुळे ती पॅरिसमध्ये इतिहास घडवेल, अशी अपेक्षा आहे. युरोपचा विचार करता ग्रेट ब्रिटनची दिना अशर स्मिथ, स्वित्झर्लंडची मुजिंगा कम्बुंदजी, पोलंडची इवा स्वोबोदा आणि जर्मनीची युरोपियन विजेती गिना ल्युकेनकेम्पर यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

Sha Carri Richardson reach women 100m semis paris olympic 2024 america after 28 years
Paris Olympic 2024 Day 8: मनू भाकर तिसरं पदक जिंकणार अन् तिरंदाजीत इतिहास रचला जाणार? पाहा आठव्या दिवसाचं वेळापत्रक

आठ हीट, तीन सेमीफायनल

महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत एकूण आठ हीट (प्राथमिक फेरी) झाल्या असून त्यातून २७ धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. यात सर्व प्रमुख धावपटूंचा समावेश आहे. या २७ जणींची तीन सेमीफायनलमध्ये विभागणी करण्यात येणार असून त्यातील नऊ जणी अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

मोसमातील सर्वोत्तम वेळ

  • शा कारी रिचर्डसन (१०.७१ सेकंद)

  • आज उपांत्य फेरी - रात्री ११.२०

  • अंतिम फेरी पहाटे - १२.५० (भारतीय वेळेनुसार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.