Ohh Shit! खेळाडूचा 'हट्ट'अमेरिकेला महागात पडला; चीनला धोबीपछाड देण्याची गमावली संधी!

Olympic 2024 Medal Table: पॅरिसमध्ये अमेरिकेला एक धडा शिकायला मिळाला. Medal Tally मध्ये शतक साजरा करणारा तो एकमेव देश आहे, परंतु तरीही त्यांना अव्वल स्थान पटकावता आले नाही.. याला जबाबदार त्यांच्याच एका खेळाडूचा 'हट्ट' ठरला आणि चीन अव्वल राहिला...
Shelby McEwen | Hamish Kerr | Paris Olympic 2024
Shelby McEwen | Hamish Kerr | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Olympic 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची आज सांगता होत आहे. चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रीडाप्रेमींना आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी देऊन जाते. यंदाची स्पर्धा त्याला अपवाद ठरली नाही... प्रेमाच्या शहरात सीन नदीच्या तीरावर पार पडलेला उद्घाटन सोहळा, खेळाडूंनी त्यांच्या प्रेमाची दिलेली कबुली, मैदानावर दिसलेली खिळाडूवृत्ती, त्याचवेळी पदकासाठी रंगलेली ठसन हेही होतेच.. काहींना यश मिळाले, तर अनेकजण काहीतरी शिकले.. असाच एक धडा अमेरिकेलाही मिळाला.. Medal Tally मध्ये शतक साजरा करणारा तो एकमेव देश आहे, परंतु तरीही त्यांना अव्वल स्थान पटकावता आले नाही.. याला जबाबदार त्यांच्याच एका खेळाडूचा 'हट्ट' ठरला आणि चीन अव्वल राहिला...

पदकतालिकेची क्रमवारी..

Paris Olympic 2024 closing ceremony आज पार पडणार आहे. पदकतालिका स्पष्ट झाली आहे आणि चीन ३९ सुवर्ण, २७ रौप्य, २४ कांस्य अशा एकूण ९० पदकांसह अव्वल स्थानी राहिले. अमेरिका ३८-४२-४२ अशा एकूण १२२ पदकांश दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया १८-१८-१४ अशा ५० पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यावरून अमेरिकेचे वर्चस्व स्पष्टपणे दिसते. पण त्यांना अव्वल स्थान पटकावता आले असते, ते कसे जाणून घेऊया..

Shelby McEwen | Hamish Kerr | Paris Olympic 2024
Paris Olympics 2024: टोक्यो ऑलिम्पिकपेक्षा भारताची यंदाची खराब कामगिरी, गोल्ड देखील मिळालं नाही...

खेळाडूचा हट्ट अन्

पुरुषांच्या उंच उडीत रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळाला. खरं तर gold medal साठी टाय झाली होती. न्यूझीलंडचा हाशिम केर (Hamish Kerr) आणि अमेरिकेचा शेलबी मॅकइवेन ( Shelby McEwen ) या दोघांना २.३८ मीटरचे अंतर पार करता आले नाही.

टोकियोची आठवण...

असे टोकियो ऑलिम्पिकमध्येही पाहायला मिळाले होते. तेव्हा गियानमार्को तम्बरी आणि मुताझ बार्शीन यांच्यात टाय झाली होती. तेव्हा तम्बरी आणि बार्शीन यांच्यात कट्टर स्पर्धा झाली. पण, वारंवार बरोबरी झालेली असताना तम्बरीला दुखापत झाली आणि त्याला माघार घ्यावी लागली.

समोर स्पर्धकच नसताना बार्शीन गोल्ड मिळाले असते. पण त्याला हे पटले नाही आणि त्याने पंचांना मी माघार घेतली तर दोन गोल्ड मेडल द्याला का विचारले. पंचांनी चर्चा करून 'हो' असे उत्तर दिले. मग दोघांना सुवर्णपदक दिले गेले..

Shelby McEwen | Hamish Kerr | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024: कुस्ती सोडायला निघालेली रितिका, पण नशिबाने कुस बदलली अन् तिनं ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी इतिहास रचला

काल काय घडले?

केर आणि मॅकइवेन यांनाही संयुक्त सुवर्ण जिंकन्याची संधी होती. पण, अमेरिकन खेळाडू हट्टाला पेटला आणि स्पर्धा सुरू ठेवण्यास सांगितले. मग काय केरने २.३४ मीटरची उंच उडी यशस्वी मारली आणि मॅकइवेनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

त्याने झाले काय अमेरिकेची सुवर्णपदकाची गाडी ३८ वर अडकली आणि चीन ३९ गोल्डसह अव्वल झाले. मॅकइवेनने हट्ट केला नसता तर अमेरिकेला सुवर्ण मिळाले असते आणि ते ३९ गोल्डसह पदक तालिकेत अव्वल झाले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.