Paris Olympic 2024: युरो विजेत्या स्पेनच्या गळ्यात ऑलिंपिक सुवर्णपदकाचाही सन्मान; यजमान फ्रान्स फायनलमध्ये पराभूत

Spain vs France: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनच्या पुरुष फुटबॉल संघाने यजमान फ्रान्सला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
Spain Football Team | Paris Olympic 2024
Spain Football Team | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Paris Olympic 2024 Football: यजमान फ्रान्सने १-ून निर्धारित वेळेत ३-३ बरोबरी साधली; पण नंतर सर्जिओ कामेलो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर युरो करंडक विजेत्या स्पेनने ऑलिंपिकमध्ये पुरुष फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकले.

चुरशीच्या अंतिम लढतीत गोलबरोबरीनंतर अतिरिक्त वेळेत कामेलो याने दोन गोल केले, त्यामुळे स्पेनला सुवर्णपदकाची लढत ५-३ फरकाने जिंकणे शक्य झाले. घरच्या मैदानावर १९९२ नंतर स्पॅनिश संघाने ऑलिंपिक पुरुष फुटबॉलमध्ये बाजी मारली होती, त्यानंतर शुक्रवारी रात्री प्रथमच सुवर्णपदक प्राप्त केले. स्पेनने गतमहिन्यात युरो करंडक पटकावताना अंतिम लढतीत इंग्लंडला हरविले होते.

Spain Football Team | Paris Olympic 2024
Vinesh Phogat: 'तुझं दु:ख समजू शकतो...', तीन वर्षांपूर्वी ५० ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिकला मुकलेल्या कुस्तीपटूचा विनेशला दिलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.