Fact Check: खांद्यावर बंदुक अन् आरशात पाहून अचूक नेम; ऑलिम्पिकमधील व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोचं काय आहे सत्य?

Paris Olympics 2024 Viral News Fact Check News : पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदके जिंकली आहेत. येत्या काही दिवसांत भारताच्या नावावर आणखी अनेक पदके येऊ शकतात. यावेळी ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या अनेक व्हिडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल होत आहे.
Truth Behind Viral Pic Of Shooter Using Mirror To Hit Target At Paris Olympics 2024
Truth Behind Viral Pic Of Shooter Using Mirror To Hit Target At Paris Olympics 2024sakal
Updated on

Paris Olympics 2024: पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन कांस्यपदके जिंकली आहेत. येत्या काही दिवसांत भारताच्या नावावर आणखी अनेक पदके येऊ शकतात. यावेळी ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या अनेक व्हिडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल होत आहे.

Truth Behind Viral Pic Of Shooter Using Mirror To Hit Target At Paris Olympics 2024
IND vs SL : एक, दोन, तीन नाही पठ्ठ्याने टीम इंडियाच्या ६ खेळाडूंची केली शिकार, कोण आहे जेफ्री वँडरसे?

पण अलीकडेच, 51 वर्षीय तुर्कीचा नेमबाज युसूफ डिकेक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या जबरदस्त स्टाइलमुळे चर्चेत आहे. आणि युसूफ डिकेकचा फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एक हात खिशात ठेवून, अगदी साध्या चष्म्याने शूटिंग करताना दिसत होता. पण त्याने असा नियम साधला की थेट 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

युसूफबद्दलच्या चर्चेदरम्यान आणखी एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती खांद्यावर बंदूक घेऊन आणि आरशात पाहून निशाणा साधत होता. पण आता व्हायरल झालेल्या 'त्या' फोटो मागील सत्य समोर आले आहे.

Truth Behind Viral Pic Of Shooter Using Mirror To Hit Target At Paris Olympics 2024
Paris Olympics : सेमीफायनलपूर्वी भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का; 'या' खेळाडूवर एका सामन्याची बंदी

ऑलिम्पिक 2024 मधील व्हायरल फोटोचं सत्य

आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हायरल फोटो ज्यामध्ये शूटर आरशात पाहताना निशाणा साधत आहे तो खोटा आहे. हे फोटो फोटोशॉप करण्यात आले आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकशी त्याचा काहीही संबंध नाही. तपासात हा फोटो बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. फोटोत तो व्यक्ती आहे तो अभिनेता आहे.

Truth Behind Viral Pic Of Shooter Using Mirror To Hit Target At Paris Olympics 2024
Paris Olympics : 0.005 चा फरक! ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात रोमांचक 100 मीटर शर्यत; Video

व्हायरल फोटोतील व्यक्ती कोण?

व्हायरल झालेला हा फोटो थायलंडच्या पोंगसाक पोंगसुवानचा आहे. तो अभिनेता आणि कॉमेडियन आहे. हा फोटो थाई गेम शो "चिंग रोई चिंग लॅन" मधून काढण्यात आला, त्यानंतर त्यावर फोटोशॉप करण्यात आला. शोमधील अभिनेत्याचा फोटो क्रॉप करून पॅरिस ऑलिम्पिकशी जोडला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.