Rebecca Cheptegei : ऑलिम्पियन धावपटूचा मृत्यू; बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून पेटवलं, कारण काय तर...

Olympian runner Rebecca Cheptegei Die : ३३ वर्षीय युगांडाच्या ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपटू रेबेका चेप्टेगीचा गुरुवारी मृत्यू झाला. तिला तिच्या प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवून दिले होते.
Rebecca Cheptegei
Rebecca Cheptegei esakal
Updated on

Uganda Olympian runner Rebecca Cheptegei पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या युगांडाच्या धावपटू रेबेका चेप्टेगी हिचा आज मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. त्यात ती ८० टक्के भाजली गेली होती आणि चार दिवसांनी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

युगांडा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी X वर एका पोस्टमध्ये दुःख व्यक्त करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "आम्हाला आमच्या ऑलिम्पिक खेळाडू रेबेका चेप्टेगीच्या दुःखद निधनाबद्दल कळले आहे. तिच्या प्रियकराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्म्याला शांती लाभो आणि आम्ही महिलांवरील हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे.''

Rebecca Cheptegei
Rebecca Cheptegei esakal

ऑलिम्पियन आणि तिचा प्रियकर यांच्यात जमिनीवरून बराच वाद झाला, त्यानंतर तिच्या प्रियकराने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळले. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, रेबेकाचा प्रियकर डिक्सन एनडेमाने पेट्रोलने भरलेला मग तिच्या अंगावर ओतला आणि त्यानंतर तिला पेटवून दिले. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, रेबेकाने काउन्टीच्या ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राजवळ जमीन खरेदी केली होती.

रेबेकाने २०१० मध्ये ॲथलेटिक्सचा प्रवास सुरू केला. ती पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये ४४व्या स्थानावर राहिली होती. चेप्टेगीला हल्ल्यानंतर केनियातील एल्डोरेट येथील मोई टीचिंग आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील क्लिनिकल सर्व्हिसेसचे वरिष्ठ संचालक ओवेन मेनाच यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवयव निकामी झाल्यामुळे चेप्टेगीचे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले.

ऑक्टोबर २०२१ मध्ये, केनियाची ऑलिम्पियन ऍग्नेस टिरोपची इटेन येथील राहत्या घरात हत्या झाली होती. तिला चाकूने अनेक जखमा झाल्या होत्या. टिरोपचा पती इब्राहिम रोटीचवर तिच्या हत्येचे आरोप ठेवण्यात आले आहेत आणि हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.