Vinesh Phogat Olympic Silver Medal : कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट ( CAS) अवघ्या काही मिनिटांत विनेश फोगाटच्या याचिकेवरील निर्णय वाचण्यास सुरुवात करतील. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ५० किलो वजनी गटाची फायनल खेळण्यापासून भारतीय कुस्तीपटूला रोखले गेले आणि तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. विनेशने या विरोधात क्रीडा लवाद अर्थात CAS कडे दाद मागितली आणि त्यावर ९.३० वाजता निर्णय येणार आहे. तत्पूर्वी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ( UWW) नियमातील एक चूक विनेशला रौप्यपदक मिळवून देणारी ठरू शकते अन् तसं न झाल्यास UWW च्या संपूर्ण सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो.
२९ वर्षीय कुस्तीपटूला ७ ऑगस्ट रोजी सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रॅन्डविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली नाही. अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियमांनुसार, तिला अपात्र ठरवण्यात आले आणि ड्रॉमध्ये शेवटचे स्थान देण्यात आले.
नियमावर बोट ठेवून UWW ने विनेश फायनल खेळू शकत नाही, असे ठामपणे सांगितले. पण, आता UWW ने दुसऱ्या खेळाडूसाठी त्याच नियमांत बदल केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या नियमांनुसार एखादा खेळाडू अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांकडून आधी पराभूत झाला असेल तरच तो रिपेचेजसाठी (कांस्यपदक सामना) पात्र ठरू शकतो. त्यामुळे जर विनेशला अपात्र ठरवून स्पर्धेत शेवटचे स्थान दिले गेले, तर उप उपांत्यपूर्व फेरीत विनेशकडून पराभूत झालेल्या युई सुसाकीला रिपेचेज फेरीत कशी पोहोचली आणि शेवटी कांस्य जिंकली? हा प्रश्न उपस्थित होतो.
विनेश ज्या गटातून खेळली, त्यातून जर कोण रिपेचेज राऊंडसाठी पात्र ठरत असेल तर ती तुर्कीची एव्हिन डेमिरहान असायला हवी. जिचा युस्नेलिस गुझमनने पहिल्या फेरीत पराभव केला होता. उपां फेरीत विनेशकडून ५-० ने पराभूत होऊनही गुझमन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. कारण, भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरली होती. इथेही UWW त्यांनी स्वतः सेट केलेले नियम रद्द करू शकतात.
CAS निश्चितपणे UWW ला प्रश्न करू शकते की त्यांनी एका प्रकरणात एक आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा नियम कसा लागू केला? हाच प्रश्न विनेशला रौप्यपदक मिळवून देणारा ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.