Vinesh Phogat CAS appeal: ३ तास युक्तिवाद, हरीश साळवे यांची जोरदार बॅटिंग! अपात्रतेच्या सुनावणीत नेमकं काय घडलं

Vinesh Phogat Olympic disqualification at CAS : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने अपात्रतेच्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर काल ३ तास युक्तिवाद रंगला.
Vinesh Phogat's Hearing
Vinesh Phogat's Hearing esakal
Updated on

Olympic 2024 Vinesh Phogat Appeal IOC CAS Live : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादात दाखल केलेल्या खटल्यात काल तीन तास युक्तिवाद रंगला. विनेशला ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी वजन १०० ग्रॅम जास्त झालं म्हणून अपात्र ठरवले गेले. याविरोधातत विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि ज्येष्ठ वकिल हरीश साळवे ही विनेशची बाजू मांडली. काल झालेल्या युक्तिवादानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ( IOA) सकारात्मक निकाल येईल अशी आशा आहे.

IOC प्रमुख थॉमस बाक नाखूश...

विनेशच्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणतात की, ''विनेश फोगटच्या भावना मी समजू शकतो. पण, अशा परिस्थितींमध्ये सवलत दिल्यानंतर नेमकी रेषा कुठे काढायची याबद्दलही मला खात्री नाही. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि शेवटी CAS चा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू, परंतु पुन्हा सांगतो आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाला त्यांचे नियम लागू करावे लागतील. ही त्यांची जबाबदारी आहे.”

CAS च्या सुनावणीत काय घडलं?

  • विनेश फोगाटच्या याचिकेवर सुनावणी २ फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली.

  • प्रथम विनेशच्या फ्रेंच वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. त्यानंतर UWW आणि नंतर IOC व शेवटी IOA यांचे प्रतिनिधित्व हरीश साळवे यांनी युक्तिवाद केले. हरीश साळवे एक तास १० मिनिटे बोलले आणि विनेशची बाजू मांडली.

  • दुसऱ्या फेरीत फ्रेंच वकिलांनी UWW त्यानंतर IOA आणि IOC यांनी आपापली भूमिका मांडली. आता CAS वैद्यकीय आयोगाचा अहवालही मागणार आहेत. पुढच्या दिवसात अंतिम निकाल अपेक्षित आहे.

Vinesh Phogat's Hearing
Vinesh Phogat's Hearingesakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.