Vinesh Phogat Verdict: विनेश फोगाटच्या याचिकेवर आज निकाल; वकिलांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले...

Senior lawyer Vidushpat Singhania on Vinesh Phogat Olympic Disqualification Case: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या याचिकेवरील निकाल आज लागणार आहे. अपात्रतेच्या निर्णयाविरोधात तिने CAS कडे दाद मागितली आहे.
vinesh phogat
vinesh phogatesakal
Updated on

Olympic 2024 Vinesh Phogat lawyer on CAS: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. तिने संयुक्त रौप्यपदकाची मागणी केली आहे आणि आज रात्री ९.३० वाजेपर्यंत त्यावर निकाल येणार आहे. विनेशच्या याचिकेवर क्रीडा लवाद काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विनेश फोगट आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील विदुष्पत सिंघानिया यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ऑलिम्पिक अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट ( CAS) समोर त्यांना अनुकूल निकालाची आशा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी हा निकाल विनेशच्या बाजूने लागल्यास तो एक ऐतिहासिक निकाल असेल, असेही म्हटले.

vinesh phogat
Vinesh Phogat verdict: चेहऱ्यावर निराशा, थकलेलं शरीर; 'त्या' घटनेनंतर विनेशचा पहिला Video समोर

CAS ची अॅड-हॉक पॅनल आज विनेशच्या याचिकेचा निकाल वाचणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या डॉ. ॲनाबेले बेनेट यांनी अधिक तपास करण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने निकालाला ७२ तासांचा विलंब झाला. डॉ. ॲनाबेले यांनी शनिवारी तीन तासांच्या सत्रात अर्जदार विनेश फोगाट, प्रतिवादी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती यांचे म्हणणे ऐकले.

"आम्हा सर्वांवर विश्वास आहे. CASच्या अॅड हॉक पॅनेलला २४ तासांची मुदत आहे. त्यांनी निकालाची मुदत एकापेक्षा जास्त वेळा वाढवली आहे. याचा अर्थ ते विनेशच्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत आहेत. हे आमच्यासाठी चांगले आहे,”असे विदुष्पत सिंघानिया यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

... तरी ती चॅम्पियनच!

"मी यापूर्वी CASमध्ये अनेक खटले लढले आहेत. CASमध्ये यशाचा दर खूपच कमी आहे. या प्रकरणात, आम्ही लवादाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सांगत आहोत. हे थोडे कठीण आहे, परंतु काहीतरी मोठे होईल अशी आशा करूया. आपण सर्वजण विनेशसाठी प्रार्थना करूया. तिला पदक मिळेल अशी आशा करूया. जरी तिला ते मिळाले नाही तरी ती चॅम्पियन आहे," असेही त्यांनी सांगितले.

vinesh phogat
Vinesh Phogat Appeal Live : विनेश फोगाटच्या मागणीवर IOC अध्यक्षांचं मोठं विधान; रौप्यपदक देणं म्हणजे...

वकिलांचा युक्तिवाद...

मंगळवारी संध्याकाळी वाढलेले वजन शरीराच्या नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रियेमुळे होते आणि त्याच्या शरीराची काळजी घेणे हा खेळाडूचा मूलभूत अधिकार आहे, असा युक्तिवाद विनेशच्या वकिलांनी केला. तसेच स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिच्या शरीराचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होते आणि वजन वाढणे केवळ पुनर्प्राप्तीमुळे झाले आणि ही फसवणूक नाही, हा मुद्दाही त्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.