पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी भारतीय महिला कुस्तीपटू ॲथलीट विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आले. विनेशचे वजन तिच्या पदक सामन्यापूर्वी निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त होते, त्यानंतर सामना अधिकाऱ्यांनी तिला अपात्र ठरवले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. या निर्णयानंतर विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिने अचानक एक मोठा निर्णय घेत कुस्तीतून निवृत्तीची घोषणा करून सर्व चाहत्यांना धक्का दिला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटातील अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगटने धक्कादायक निर्णय घेत निवृत्ती स्वीकारत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विनेशने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती 2001-2024"
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी!
याआधी, बुधवारी रात्री उशिरा आलेल्या बातम्यांनुसार, पॅरिसमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5.51 वाजता, तिने आपल्याला रौप्य पदक मिळावे यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) कडे अपील केले आहे. यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.
खरे तर विनेशने मंगळवारी सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, बुधवारी तिचे वजन मोजले असता ते 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले.
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि त्याची स्थापना 1984 मध्ये झाली आहे.
भारतातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या विनेश फोगटचा जन्म 1994 मध्ये झाला. विनेशचे काका महावीर सिंग यांनी फार कमी वेळात फोगट आणि तिची बहीण बबिता फोगट यांना कुस्तीची ओळख करून दिली.
2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत विनेश फोगटने तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. तिने सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण त्यादरम्यान तिला पदक मिळवण्यात अपयश आले. 2018 मध्ये विनेशने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.
2021 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती टोकियो ऑलिम्पिकचा भाग राहिली. त्यानंतर 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.