Vinesh Phogat verdict: PT Usha यांनी हात झटकले! विनेशच्या याचिकेचा निर्णय येण्यापूर्वी म्हणाल्या, ती आमची जबाबदारी नाही

PT Usha vs Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला रौप्यपदक मिळणार की नाही? याचा फैसला १३ तारखेला होईल, पण आता वेगळाच वाद सुरू झाला आहे.
vineshphogat
vineshphogatesakal
Updated on

Olympic 2024 Vinesh Phogat Verdict : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतीय खेळाडू १ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ६ पदकं घेऊन मायदेशी परतले. टोकियोनंतर भारतीय संघ पॅरिसमध्ये पदकाचा दुहेरी आकडा सहज पार करतील असे वाटले होते, परंतु पुन्हा एकदा चौथ्या स्थानाचं दडपण खेळाडूंना पेलवलं नाही. त्यांची काही पदकं थोडक्यात हुकली. अजूनही भारताला टोकियोच्या ७ पदकांची बरोबरी करण्याची संधी आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या याचिकेचा निकाल काल लागतो, त्यावर हे शक्य आहे. १३ ऑगस्टला विनेशच्या याचिकेचा निकाल अपेक्षित आहे, परंतु त्याआधी भारतात ब्लेम गेम सुरू झाला आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( IOA) च्या अध्यक्षा पी टी उषा ( PT Usha) यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. विनेश फोगाटने क्रीडा लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेत थेट IOA च्या वैद्यकीय टीमवर विशेषतः डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्यावर आरोप केले होते. त्यावर पी टी उषा यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग व ज्युदो या खेळात वजन नियंत्रणात ठेवणे ही सर्वस्वी खेळाडूचीच जबाबदारी असते.

vineshphogat
Paris Olympics: भारताची मोहिम 6 पदकांवर संपली; प्रयत्न करूनही Medals Table मध्ये झाली घसरण 

विनेशच्या याचिकेचा निर्णय येण्यापूर्वी उषा यांनी केलेल्या विधानाने नवी चर्चा रंगू लागली आहे. विनेशने क्रीडा लवादाकडे ( CAS) किमान तिला संयुक्त रौप्यपदक दिले जावे, अशी मागणी केली आहे. ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी केलेल्या वजनात विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक आढळले आणि त्यामुळे तिला अपात्र ठरवले गेले आहे.

२९ वर्षीय विनेश ही ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली. पण, अपात्रतेच्या निर्णयानंतर तिने एक दिवसानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे भारतात पुन्हा दोषारोपाचा खेळ सुरू झाला. संसदेतील काही खासदारांनी डॉ. पारदीवाला आणि त्यांच्या टीमवर निष्काळजीपणाचा आरोप केला. माजी IOA प्रमुख नरेंद्र बात्रा यांनी, विनेशच्या आहाराचा तिच्या अपात्रतेशी काहीतरी संबंध असू शकतो, असा दावा केला.

vineshphogat
Vinesh Phogat CAS appeal: विनेश फोगटच्या याचिकेवर निकाल लागण्यास का होतोय उशीर?

पी टी उषा काय म्हणाल्या?

"...कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग आणि ज्युदो यांसारख्या खेळातील वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडूची आणि त्यांच्या प्रशिक्षकाची असते. IOA-नियुक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारदीवाला आणि त्यांच्या टीमचा त्यात दोष नाही. IOA वैद्यकीय संघ, विशेषत: डॉ. पारदीवाला यांच्यावर होत असलेले आरोप निषेधास पात्र आहेत,''असे उषा यांनी स्पष्ट केले.

खेळाडूंचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ...

त्यांनी पुढे स्पष्ट केले की बहुतेक खेळाडूंचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ असतो आणि IOA-नियुक्त वैद्यकीय टीम जी पॅरिस गेम्सच्या काही महिन्यांपूर्वी तयार केली गेली होती, ती फक्त खेळाडूंना बरे करण्यासाठी आणि दुखापतींचे व्यवस्थापन करण्यात मदत करण्याचे काम करते.

"पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अशा खेळातील प्रत्येक भारतीय खेळाडूचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ होता. हा सपोर्ट स्टाफ अनेक वर्षांपासून खेळाडूंसोबत काम करत आहे. IOA ने काही महिन्यांपूर्वी एक वैद्यकीय टीम नियुक्त केली होती. मुख्यतः ही टीम स्पर्धेदरम्यान आणि नंतर खेळाडूंच्या पुनर्प्राप्ती व दुखापतींच्या व्यवस्थापनात मदत करेल. ज्या खेळाडूंचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ नाही, अशा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ही टीम तयार करण्यात आली होती," हेही उषा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.