Vinesh Phogat : विनेश फोगाटची अपील CAS ने स्वीकारली, भारतीय कुस्तीपटूला मिळणार का रौप्यपदक?

Vinesh Phogat controversy : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.
Vinesh Phogat disqualified
Vinesh Phogat disqualifiedesakal
Updated on

Paris Olympic 2024 Vinesh Phogat controversy : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने भारतीय कुस्तीपटूची अपील स्वीकारली आहे आणि तिचं म्हणणं ऐकूण घेणार आहे. मग विनेशला रौप्यपदक दिले जाऊ शकते का?

१०० ग्रॅम अधिक भार झाल्याने विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटाच्या फायनलमधून अपात्र ठरवले गेले. जागतिक कुस्ती महासंघ व ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे. पण, काल कुस्तीपटू विनेश फोगाटनेच क्रीडा लवादाकडे याबाबत दाद मागितली होती.

विनेश फोगाटने केलेल्या अपीलमध्ये तिच्याबाबतच निर्णय येईपर्यंत फायनल थांबवावी अशी विनंती केली गेली होती. पण, लवादाने तसं करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर विनेशने किमान तिला रौप्यपदक दिले जावे अशी विनंती केली होती. गुरुवारी सकाळी याबबातचा अंतिम निर्णय येणे अपेक्षित होते. पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार क्रीडा लवादाने तिचे अपील स्वीकारले आहे आणि येत्या २४-४८ तासांत निर्णय येऊ शकतो. पण, तज्ज्ञाच्या मते विनेशला रौप्य मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. विनेशने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती 2001-2024. आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी!''

विनेशने वजनी गट का बदलले?

विनेशने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५३ किलो वजनी गटातून सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदकंही तिने याच गटातून जिंकली होती. पण, अंतिमने भारताला ५३ किलो महिला वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेची पात्रता मिळवून दिली आणि त्यामुळे विनेशने ५० किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, अंतिमला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

Vinesh Phogat disqualified
मोठा धक्का : भारताची कुस्तीपटू Antim Panghal वर तीन वर्षांची बंदी? IOA म्हणते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.