सांगण्यासारखं बरंच काही आहे, योग्य वेळ...; Vinesh Phogat नं मन मोकळं करणारं ३ पानी पत्र लिहिलं

Vinesh Phogat Statement : ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक न देण्याचा निर्णय क्रीडा लवादाने घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ३ पानी पत्र लिहून तिचं मन मोकळं केलं आहे.
सांगण्यासारखं बरंच काही आहे, योग्य वेळ...; Vinesh Phogat नं मन मोकळं करणारं ३ पानी पत्र लिहिलं
Updated on

Vinesh Phogat Statement : ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक न देण्याचा निर्णय क्रीडा लवादाने घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ३ पानी पत्र लिहून तिचं मन मोकळं केलं आहे. ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक झाल्याने विनेशला अपात्र ठरवले गेले. त्याविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती आणि संयुक्त रौप्यपदक देण्यात यावे अशी विनंती तिने केली होती. तीन वेळा तारीख पुढे ढकलल्यानंतर अखेर क्रीडा लवादाने तिची याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशचे रौप्यपदकाचे स्वप्न भंगले.

ती लिहीते,'' ऑलिम्पिक रिंग्स: एका लहान गावातील एक लहान मुलगी म्हणून मला ऑलिम्पिक म्हणजे काय किंवा या रिंग्जचा अर्थ काय आहे हे माहित नव्हते. माझे वडील, एक सामान्य बस ड्रायव्हर होते. आपल्या मुलांनी एकदिवस विमानातून प्रवास करावा आणि मी रस्त्यावर चालताना ते विमान पाहावं, एवढंच काय ते त्यांचं स्वप्न... मी माझ्या वडिलांचे हे एकच स्वप्ने सत्यात उतरवू शकले. माझ्या आईच्या आयुष्यातील कष्टांवर एक संपूर्ण कथा लिहिली जाऊ शकते. तिच्या सर्व मुलांनी तिच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगावं, हिच तिची इच्छा... तिच्या इच्छा आणि स्वप्ने माझ्या वडिलांपेक्षा खूप साधी होती.''

''अनेक संकट आली तरी त्यांनी देवावर विश्वास ठेवून आपला संघर्ष सुरूच ठेवला. आई नेहमी म्हणायची, देव चांगल्या लोकांसोबत कधीच वाईट होऊ देणार नाही, '' हेही ती लिहिते.

ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रसंगावर विनेश लिहिते,'' सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु त्यासाठी पुरेसे शब्द माझ्याकडे सध्या नाहीत आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी पुन्हा बोलेन. ६ऑगस्टच्या रात्री आणि ७ ऑगस्टच्या सकाळ.. याबाबत मी एवढेच सांगेन की आम्ही हार मानली नाही. आमचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आम्ही शरणागती पत्करली नाही, पण घड्याळाचा काटा आमच्यासाठी थांबला आणि ती वेळ योग्य नव्हती. ''

vineshphogat letter
vineshphogat letteresakal

'' माझ्या टीमला, माझ्या भारतीय सहकाऱ्यांना आणि माझ्या कुटुंबाला असे वाटते की आम्ही ज्या ध्येयासाठी काम करत होतो आणि जे साध्य करण्यासाठी आम्ही योजना आखली होती ती अपूर्ण राहिली आहे. त्या गोष्टी पुन्हा कधीही पूर्वीसारख्या होऊ शकत नाहीत. कदाचित अपात्रतेची कारवाई झाली नसती तर मी २०३२ पर्यंत खेळू शकले असते. कारण माझ्यात जिद्द आणि माझ्यात कुस्ती नेहमीच असेल. भविष्यात माझ्यासाठी काय आहे आणि या प्रवासात मला काय वाटेल हे मी सांगू शकत नाही. मला खात्री आहे की मी ज्यावर विश्वास ठेवते आणि योग्य गोष्टीसाठी मी नेहमीच लढत राहीन.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.