Paris Olympic No silver medal for Vinesh Phogat : भारतीय क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्तीपटू विनेश फोगाट हिता अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर प्रचंड नाराजी असताना निकाल भारतीय खेळाडूच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. क्रीडा लवादाने तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर विजय आपलाच असे वाटू लागले होते, परंतु १६ ऑगस्ट निकालाची तारीख असताना बुधवारीच धक्का देणारा निकाल क्रीडा लवादाने दिला. ऑलिम्पिक स्पर्धेत संयुक्त रौप्यपदक दिले जावे, ही विनेशची याचिकाच फेटाळली गेली.
५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी नियमाप्रमाणे दोन्ही खेळाडूंचं वजन केलं गेलं. त्यात भारतीय कुस्तीपटूचं वजय १०० ग्रॅम अधिक भरलं आणि त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. विनेशविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला फायनलमध्ये एन्ट्री दिली गेली. ऑलिम्पिक समितीने ही कारवाई नियमाला धरूनच केल्याचा दावा केला. त्यामुळे विनेशला पदकापासून वंचित रहावे लागले.
दिवसाला तीन बाऊट खेळल्यानंतर विनेश फोगाटचे वजन २ किलोने वाढल्याचे निदर्शनास आले. ते कमी करण्यासाठी विनेश आदल्या रात्री झोपलीही नाही. तिने रात्रभर कसरत करून वजन कमी करण्यावर भर दिला. काही मीडिया रिपोर्टनुसार तिने शरीरातील रक्तही काढले आणि केसही कापले. इतकं करूनही तिचे वजन १०० ग्रॅम अधिक राहिले. त्यामुळे त्याला फायनलला मुकावे लागले.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( IOA) आता पुढील पर्यायांचा शोध घेणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो गटात संयुक्त रौप्यपदक मिळवून देण्यासाठी विनेशचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय धक्कादायक आहे. विनेशसाठी आणि मोठ्या प्रमाणावर क्रीडा समुदायासाठी हा महत्त्वपूर्ण परिणाम आहे. १०० ग्रॅमची किरकोळ विसंगती आणि त्यामुळे उद्भवलेले प्रश्न हे केवळ विनेशच्या कारकिर्दीवरच नव्हे, तर नियमातील अस्पष्टता आणि त्यांच्या व्याख्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
IOA चा ठाम विश्वास आहे की, वजनाच्या उल्लंघनासाठी ॲथलीटला अपात्र ठरवण्याआधी सखोल तपासाची आवश्यकता आहे. आमच्या कायदेशीर प्रतिनिधींनी लवादासमोर त्यांचे मुद्दे योग्यरित्या समोर आणले होते.
विनेशचा समावेश असलेले हे प्रकरण कठोर आणि वादातीत आहे. ते ऍथलीट्स विशेषत: महिला खेळाडूला याचा किती शारीरिक आणि मानसिक त्रास होईल याचा विचार करत नाही. क्रीडापटूंच्या कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या नियमांची अधिक गरज असल्याचे यातून स्पष्ट होते.
CAS च्या आदेशानंतर IOA फोगटला पूर्ण पाठिंबा देत आहे आणि पुढील कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहे. विनेशच्या केसची सुनावणी होईल याची खात्री करण्यासाठी IOA वचनबद्ध आहे. हे क्रीडा क्षेत्रातील न्याय आणि निष्पक्षतेचे समर्थन करत राहील. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि प्रत्येकाचे हक्क आणि प्रतिष्ठा कायम राखली जाईल, हे सुनिश्चित केले जाईल.
IOA अध्यक्ष पीटी उषा यांनी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) विरुद्ध कुस्तीपटू विनेश फोगाटचा अर्ज फेटाळण्याच्या CAS चा निर्णय धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.