Video of Vinesh Phogat at Olympic Games Village: मागील काही दिवस भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यासाठी कसोटीचे राहिले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये प्रवेश करून विनेशने इतिहास घडवला. कुस्ती स्पर्धेची फायनल खेळणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली असती, परंतु फायनलच्या सकाळी विनेशवर अपात्रतेची कारवाई केली गेली. हा विनेशसह सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. त्यानंतर विनेशच्या बाबतीत अनेक बातम्या आल्या, तिला हॉस्पिटलमध्येही भरती गेले होते. विनेशने ऑलिम्पिक समितीच्या निर्णया विरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे...
५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी नियमाप्रमाणे दोन्ही खेळाडूंचं वजन केलं गेलं. त्यात भारतीय कुस्तीपटूचं वजन १०० ग्रॅम अधिक भरलं आणि त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. विनेशविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला फायनलमध्ये एन्ट्री दिली गेली. ऑलिम्पिक समितीने ही कारवाई नियमाला धरूनच केल्याचा दावा केला. त्यामुळे विनेशला पदकापासून वंचित रहावे लागले.
दिवसाला तीन बाऊट खेळल्यानंतर विनेश फोगाटचे वजन २ किलोने वाढल्याचे निदर्शनास आले. ते कमी करण्यासाठी विनेश आदल्या रात्री झोपलीही नाही. तिने रात्रभर कसरत करून वजन कमी करण्यावर भर दिला. काही मीडिया रिपोर्टनुसार तिने शरीरातील रक्तही काढले आणि केसही कापले. इतकं करूनही तिचे वजन १०० ग्रॅम अधिक राहिले. त्यामुळे त्याला फायनलला मुकावे लागले.
अपात्रतेच्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली. विनेशच्या याचिकेवर २ फेऱ्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली. प्रथम विनेशच्या फ्रेंच वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. त्यानंतर UWW आणि नंतर IOC व शेवटी IOA यांचे प्रतिनिधित्व हरीश साळवे यांनी युक्तिवाद केले. हरीश साळवे एक तास १० मिनिटे बोलले आणि विनेशची बाजू मांडली. १३ ऑगस्टला म्हणजेच उद्या रात्री ९.३० वाजता निर्णय येणार आहे...
ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर आता सर्व खेळाडू परतीच्या मार्गावर आहेत. भारताने पॅरिसमध्ये १ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ६ पदक जिंकली. विनेशचे पदक आले असते तर भारताने टोकियो ऑलिम्पिकच्या पदकाच्या संख्येशी बरोबरी केली असती.... याचिकेवरील निकालासाठी विनेश अजूनही पॅरिसमध्ये आहे आणि तिने आता ऑलिम्पिक व्हिलेज सोडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.