Wrestler Aman Sehrawat Story: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताला कुस्तीतील पदक अखेर मिळाले. भारताला कुस्तीतील पहिलं पदक मिळवून दिलं २१ वर्षीय अमन सेहरावत याने. त्यानं कांस्य पदकाच्या लढतीत प्युएर्तो रोकोत्या डॅरियन क्रुइझला १३-५ अशा फरकाने पराभूत केले. यासह आता भारताच्या खात्यात ६ पदके झाली आहेत.
अमनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमनच्या आईचे तो १० वर्षांचा असतानाच निधन झाले. त्यानंतर वर्षभरातच वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षीच तो आणि त्याची धाकटी बहिण पूजा अनाथ झाले. त्यांची जबाबदारी मग त्यांचे काका सुधीर सेहरावत आणि आजोबा मांगेराम सेहरावत यांनी घेतली.