Who Is Imane Khelif : कोण आहे नेमकी इमाने खलिफ? जी Olympicमध्ये सापडली वादाच्या भोवऱ्यात

Imane Khelif Algerian Boxer Gender Controversy : इमाने खलिफ पुरुष असल्याचा आरोप, इटलीच्या अँजेलाने लढत सोडली
 Imane Khelif
Imane Khelifsakal
Updated on

पॅरिस : ऑलिंपिक स्पर्धेतील महिला विभागातील एक लढत भलतीच वादग्रस्त ठरली आहे. महिला बॉक्सर विरुद्ध ‘पुरुष’ बॉक्सर असा हा वाद आहे. परिणामी इटलीच्या अँजेला कारिनी हिने ४६ सेकंदात पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आणि हा वाद सोशल मीडियातून सर्व जगाने दखल घ्यावी एवढा मोठा झाला.

अल्जेरियाची इमाने खलिफ आणि इटलीची कारिनी यांच्यातील ही पहिल्या फेरीची लढत. इमाने ही पुरुष असल्यामुळे आणि तिचे काही ताकदवर फटके सहन केल्यानंतर कारिनीने ४६ सेकंदात अतिशय नाराज मनाने आणि आपली फसवणूक झाल्यामुळे डोळ्यात अश्रू आणत लढत सोडून दिली. गतवर्षी एका लिंग चाचणीत इमाने नापास झाली होती, तरीही तिला ऑलिंपिकमध्ये प्रवेश देण्यात आला.

 Imane Khelif
Paris Olympic 2024 Day 7: तिरंदाजीत पदक हुकलं, पण मनू भाकर तिसऱ्यांदा फायनलमध्ये, तर लक्ष्य सेनची आगेकूच; दिवसभरात काय घडलं?

इमाने नेमकी कोण आहे?

इमाने ही महिला आहे, असे तिच्या पासपोर्टवर नमूद केलेले आहे आणि त्याचमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने या ऑलिंपिक स्पर्धेत तिला महिला विभागात खेळण्यास परवानगी दिली. ती गेल्या काही वर्षांत महिलांच्या स्पर्धेत सहभागी होत आहे.

विशेष म्हणजे गतवेळच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतही तिने अल्जेरियाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला होता. २०१८ मधील जागतिक अजिंक्यपद आणि २०१९ मधील विश्वकरंडक बॉक्सिंग स्पर्धेतही ती खेळली होती, परंतु फारसा प्रभाव पाडता आला नव्हता.

 Imane Khelif
Paris Olympic 2024 : शा कारी रिचर्डसन अमेरिकेचा २८ वर्षांचा दुष्काळ संपविणार?

अगोदरही होती बंदी

२०२३ मधील जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने काही खेळाडूंची लिंग चाचणी केली होती. त्यात इमाने महिला असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले होते.

मग ऑलिंपिकमध्ये स्थान कसे?

२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने केलेल्या लिंग चाचणीत इमाने खलिफ महिला असल्याचे सिद्ध झाले नव्हते, तर ती पॅरिस ऑलिंपिकमध्ये कशी खेळू शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे,

परंतु पॅरिस ऑलिंपिकमधील खेळ आणि नियम आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकच्या अधिपथ्याखाली येतात. त्यामुळे आमचा हस्तक्षेप येऊ शकत नाही, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय या संघटनेत असलेल्या आर्थिक गैरकारभारावरून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २०१९ मध्ये त्यांची मान्यता रद्द केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.