Who is Swapnil Kusale : तांदळाची भाकरी अन्‌ मेथीची भाजी खाणारा कोल्हापूरचा पठ्ठ्या गाजवतोय जगात नाव...

भारतीय खेळाडूंची नेमबाजी या खेळातील नेत्रदीपक कामगिरी बुधवारीही कायम राहिली. मनू भाकर हिची दोन ब्राँझपदके आणि सरबज्योत सिंगच्या ब्राँझपदकानंतर आता महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळे याच्याकडूनही पदक मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे.
Paris 2024 Olympics Swapnil Kusale News
Paris 2024 Olympics Swapnil Kusale Newssakal
Updated on

भारतीय खेळाडूंची नेमबाजी या खेळातील नेत्रदीपक कामगिरी बुधवारीही कायम राहिली. मनू भाकर हिची दोन ब्राँझपदके आणि सरबज्योत सिंगच्या ब्राँझपदकानंतर आता महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू स्वप्नील कुसाळे याच्याकडूनही पदक मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे.

स्वप्नील याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराची अंतिम फेरी गाठली असून आता पदकाची शर्यत आज (ता. १) रंगणार आहे. ४४ नेमबाजांमधून आठ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. पहिलेच ऑलिंपिक खेळणाऱ्या स्वप्नील याने सातवा क्रमांक पटकावताना पदक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

Paris 2024 Olympics Swapnil Kusale News
Paris Olympic Deepika Kumari Archery : शूटऑफमध्ये रोमहर्षक विजय! दीपिका कुमारीचे पाऊल पडते पुढे...

स्वप्नील कुसाळे याने निलिंग पोझिशनमध्ये (गुडघ्यावर रायफल ठेवून निशाणा लावणे) १९८ गुणांची कमाई केली. त्याने प्रोन पोझिशनमध्ये (जमिनीवर रेलून निशाणा लावणे) १९७ गुणांची कमाई केली. तसेच स्टॅण्डिंग पोझिशनमध्ये (उभे राहून निशाणा लावणे) १९५ गुणांची कमाई करण्यात त्याला यश लाभले. भारताच्या या पठ्ठ्याने एकूण ५९० गुणांची कमाई करीत सातवा क्रमांक पटकावला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराची अंतिम फेरी गाठणारा स्वप्नील कुसाळे हा भारताचा पहिलाच नेमबाज ठरला आहे.

तांदळाची भाकरी अन्‌ मेथीची भाजी

दैनिक ‘सकाळ’ने याप्रसंगी स्वप्नीलचे वडील किशोर कुसाळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्वप्नीलबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘स्वप्नीलचे नेमबाजी या खेळावर अतिशय प्रेम आहे. त्याने आतापर्यंत प्रचंड मेहनत केली आहे. आणखी एक बाब त्याच्याबद्दल सांगावीशी वाटते की, त्याला जेव्हा थोडी विश्रांती मिळते, तेव्हा तो आमच्या येथे (कोल्हापूर) येतो. यादरम्यान तो फक्त घरच्या जेवणाला प्राधान्य देतो. बाहेरचे खाणे टाळतो. सकाळी न्याहारीलाही त्याला तांदळाची भाकरी व मेथीची भाजी खायला आवडते.’’

Paris 2024 Olympics Swapnil Kusale News
Piyush Chawla Son: बाप तसा बेटा! पीयूष चावलालाही करता येईना ७ वर्षांच्या लेकाच्या फिरकीचा सामना Video

चीनचा लिऊ पहिल्या स्थानावर

जागतिक विक्रम नावावर असलेला चीनचा नेमबाज लिऊ युकून याने ५९४ गुणांसह पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावला. नॉर्वेच्या जॉन हेग याने ५९३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या सेरहिए कुलीश याने ५९२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली.

इतर नेमबाजांचा निशाणा चुकला

स्वप्नील कुसाळे याने अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी भारताच्या इतर नेमबाजांना बुधवारी ऑलिंपिकमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमर याला ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ५८९ गुणांसह अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ट्रॅप प्रकारात राजेश्‍वरीकुमारी हिची २२व्या स्थानावर, तर श्रेयसी सिंग हिची २३व्या स्थानावर घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.