Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्याचा मुद्दा बराच गाजला आहे. तिला ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिला अंतिम सामना खेळता आला नव्हता.
यानंतर विनेशने क्रीडा लवादाकडे (CAS) दाद मागितली आहे. तिने याचिका दाखल करत तिला किमान संयुक्तपणे रौप्य पदक तरी मिळावं अशी विनंती केली आहे. या याचिकेवर पॅरिसमध्ये शुक्रवारी ३ तास सुनावणी झाली. विनेशची बाजू या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी मांडली होती. मात्र, अद्याप यावर कोणताही निकाल अद्याप आलेला नाही.