Vinesh Phogat receives warm welcome: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर शनिवारी मायदेशी परतली. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गटात खेळताना अंतिम फेरीत धडक मारली होती.
परंतु, अंतिम फेरीपूर्वी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. तिने यासाठी क्रीडा लवादाकडे दादही मागितली होती. परंतु, तिची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता ती भारतात परतली आहे.
भारतात परतल्यानंतर तिला भावनाही अनावर झाल्या होत्या. तिचे भारतात जल्लोषात स्वागत झाले. हे स्वागत पाहून तिचे डोळे पाणावले होते. यावेळी तिने असंही सांगितलं की 'सर्व देशवासियांचे आभार, मी खरंत भाग्यशाली आहे.