Wrestler Vinesh Phogat alleged WFI president Sanjay Singh: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेदरम्यान काही वाद समोर आले आहेत. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीचा सामना खेळण्यापूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिची सुवर्ण पदकाची संधीही हुकली.
आता घटनेनंतर विनेश फोगटच्या वकीलांनी दिल्ली उच्च न्यायालयात असा आरोप केलाय की ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिच्यावतीने सर्व निर्णय भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि अध्यक्ष संजय सिंग घेत आहेत. थोडक्यात ते हस्तक्षेप करत असल्याचा आरोप तिने केला आहे.
याबाबत विनेशच्या वतीने वरिष्ठ वकील राहुल मेहरा हे न्यायालयात होते. त्यांनी याकडेही लक्ष वेधले की डब्ल्यूएफआयच्या कार्यकारी समितीला डिसेंबर २०२३ मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निलंबित केलं होतं.